शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

फांगुळगव्हाण परिसरातील पाणीप्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 00:28 IST

फांगुळगव्हाण परिसरातील शिवाजीनगर भागातील नागरिकांचा पाणीप्रश्न सुटला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत शारीरिक अंतर राखत सामूहिक श्रमदानातून विहीर साकारण्यात आली असून, महिलांची पायपीट थांबणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्दे एकीचे बळ : लॉकडाऊनच्या कालावधीत ग्रामस्थांनी साकारली विहीर

इगतपुरी : तालुक्यातील फांगुळगव्हाण परिसरातील शिवाजीनगर भागातील नागरिकांचा पाणीप्रश्न सुटला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत शारीरिक अंतर राखत सामूहिक श्रमदानातून विहीर साकारण्यात आली असून, महिलांची पायपीट थांबणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. यानिमित्ताने गावातील एकोप्याचे दर्शन घडले असून, इतर गावांसाठी हा उपक्रम आदर्शवत ठरला आहे.अनेक वर्षांपासून फांगुळगव्हाण, शिवाजीनगर भागात पाण्याची समस्या पाचवीलाच पूजलेली होती. उन्हाळ्यात जलवाहिनीद्वारे पाणी येते, मात्र पावसाळ्यात विजेची अडचण, मशीन वारंवार बिघडणे यामुळे पाण्याची समस्या जाणवत होती. पावसाळ्यात महिलांना निसरड्या बांधांवरून ५०० मीटर अंतरावर पायी चालत जावे लागत असे. बांधावरून घसरल्यामुळे अनेक अपघातही झाले आहेत.या भागात एकही विहीर नसल्याने व गावची पाणीपुरवठा योजना अर्धवट असल्याने यंदाच्या पावसाळ्यात पाणी समस्या उद्भवणार होती. मात्र, येथील सेवाभावी तरुण धनराज म्हसणे, ईश्वर चव्हाण यांनी गावातील तरुणांना एकत्र करत लॉकडाऊनच्या सुट्टीचा व वेळेचा सदुपयोग करण्याचा प्रस्ताव समोर आणला. या परिसरात विहीर खोदण्याचा व विहिरीपर्यंत रस्ता साकारण्याचा विचार ग्रामस्थांपुढे मांडला. यावर कृष्णा आंदाडे, रायबा भगत, खुशाल चव्हाण, भगीरथ म्हसणे, रतन म्हसणे, धनराज भागडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ भटाटे, दिनेश आंदाडे, चंद्रकांत गतिर, आक्षय चव्हाण, आजय म्हसणे, बाळू आंदाडे, हरिभाऊ म्हसणे, राममकिसन म्हसणे, प्रमोद म्हसणे आदी तरुणांनी विहीर खोदायच्या कामाला सुरुवात केली. या कामासाठी भगवान महाराज म्हसणे, राजीव कुमार, शक्ती उपाध्याय, व्यंकटेश भागडे, तलाठी ठाकरे, ग्रामसेवक सानप, वैभव गगे व शिवप्रेमी मित्रमंडळाच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.तरुण करीत असलेले काम पाहून शिवाजीनगरमधील आबालवृद्धांनीही यथाशक्ती मदत केली. अवघ्या पाच दिवसांत २० फूट खोल विहीर खोदली. परिसरातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने विहिरीच्या कठड्याचे कॉँक्रिटीकरण करण्यात आले. बांधकाम कारागीर सुभाष म्हसणे, आशोक म्हसणे, हरिश्चंद्र भागडे, राजू भागडे, सोमनाथ म्हसणे, मनोहर म्हसणे, रतन म्हसणे यांनी विनामूल्य काम पूर्ण केले.

टॅग्स :Waterपाणी