पिंपळगाव बसवंत येथे घरात घुसले पाणी
By Admin | Updated: August 3, 2016 00:35 IST2016-08-03T00:34:33+5:302016-08-03T00:35:30+5:30
पिंपळगाव बसवंत येथे घरात घुसले पाणी

पिंपळगाव बसवंत येथे घरात घुसले पाणी
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत परिसरात रात्री १२ वाजेपासून पावसाची संततधार सुरू असून शहरातील मन्याड नाल्याला पाणी आल्याने दगूनाना मोरे नगर, बाजार पेठ, जुना आग्रा रोड आदि भागातील दुकानांत पाणी शिरले होते.
दगूनाना नगर भागातील रहिवाशांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले होते. ग्रामपंचायत प्रशासन व अग्निशमन विभागाचे सर्व कर्मचारी शहरात लक्ष ठेवून आहेत़ तसेच कादवा नदीला तब्बल दहा वर्षांनंतर महापूर आल्याने नागरिकांनी पूर पाहाण्यासाठी गर्दी केली होती.