शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गावातून वाहणारे पाणी वळविले नदीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 16:02 IST

भेंडाळी : जलसंधारणात तरुणांचा पुढाकार

ठळक मुद्देगावात पडणारे पावसाचे पाणी गावातील नदीला सोडून नदीत जिरवले तर पाण्याच्या पातळीत वाढ होईल आणि आजूबाजूच्या विहिरींना फायदा होईल याची जाणीव झाली.

सायखेडा : भेंडाळी परिसरात महिनाभराच्या विश्रांतीनंतर दाखल झालेल्या पावसाचे वाहून जाणारे पाणी नदीकडे वळविण्यात युवकांनी घेतलेला पुढाकार चर्चेचा विषय बनला आहे. भर पावसात वाया जाणारे पाणी गावकुसाला असलेल्या नदीत नाली करून काढून दिल्याने पाण्याबद्दल असलेली जागरूकता यानिमित्ताने पहायला मिळाली.मागील वर्षी जेमतेम पाऊस पडला होता. त्यामुळे वर्षभर गावाने भयंकर दुष्काळ अनुभवला. गावातील अनेक फळबागा पाण्याअभावी तोडव्या लागल्या. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला होता. खर्च करून शेतात उभी केलेली पिके डोळ्यादेखत करपून गेली. एप्रिल-मे महिन्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा भयाण दुष्काळात पाण्याच महत्व अनेकांना पटले. गावात पडणारे पावसाचे पाणी गावातील नदीला सोडून नदीत जिरवले तर पाण्याच्या पातळीत वाढ होईल आणि आजूबाजूच्या विहिरींना फायदा होईल याची जाणीव झाली. त्यासाठी काही तरु णांनी पुढाकार घेतला आणि अनेक दिवसांनी पाऊस पडल्यानंतर गावातील पाणी गावकुसाच्या रस्त्याने वाहून जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हातात फावडे, टिकाव, पहार घेऊन नाली खोदली. काही ठिकाणी नाली कचरा आणि प्लास्टिक कागदांनी भरून गेली होती. ती साफ करण्यात आली आणि वाहून जाणारे पाणी नदीत सोडण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी