शहरात आजपासून पुन्हा पाणीकपात
By Admin | Updated: November 16, 2015 23:15 IST2015-11-16T23:14:24+5:302015-11-16T23:15:19+5:30
शहरात आजपासून पुन्हा पाणीकपात

शहरात आजपासून पुन्हा पाणीकपात
नाशिक : दिवाळीमुळे रद्द करण्यात आलेली शहरातील पाणीकपात मंगळवारपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. पालिकेच्या सूत्रांनी ही माहिती दिली.
चालू वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने गंगापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्यामुळे वर्षभर पाणी जपून वापरण्यासाठी पाणीकपात करण्यात आली आहे. कुंभमेळा संपताच शहरात पाणीकपात सुरू करण्यात आली होती. त्यानुसार सिडको, सातपूर वगळता अन्य चार विभागांत एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर सिडको आणि सातपूर विभागात सध्याच्या एकवेळच्या पाणीपुरवठ्यातही कपात करण्यात आली होती. मात्र, दिवाळीमुळे आठ दिवस पाणीकपात रद्द करण्यात आली होती. दिवाळी संपताच मंगळवारपासून पुन्हा पाणीकपात सुरू करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पालिकेला पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. अन्यथा उन्हाळ्यात पाणीकपात वाढण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.