येवल्यात १५ पासून तीन दिवसाआड पाणी

By Admin | Updated: August 13, 2014 00:39 IST2014-08-12T22:53:59+5:302014-08-13T00:39:16+5:30

येवल्यात १५ पासून तीन दिवसाआड पाणी

Water from 15 to 3 days in Yeola | येवल्यात १५ पासून तीन दिवसाआड पाणी

येवल्यात १५ पासून तीन दिवसाआड पाणी

येवला : येवला शहरवासीयांना १५ आॅगस्टपासून आता पूर्ववत तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी दिली.
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहराला सध्या पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पालखेडचे ओव्हरफ्लो पाण्याचे आवर्तन येवला तालुक्याला मिळाले. त्यामुळे साठवण तलावात सुमारे ४० द.ल.घ.फू. पाणी पालिकेने भरून घेतले. त्यामुळे आता तलावात तीन महिने पुरेल इतपत पाणीसाठा झाल्याने तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. टंचाई काळात शहरवासीयांनी पाणी जपून वापरून सहकार्य केले. याबाबत नगराध्यक्ष शबाना शेख, उपनगराध्यक्ष पंकज पारख, पाणीपुरवठा समिती प्रमुख मुश्ताक शेख, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. पालिकेच्या पाइपलाइन वरून विनापरवाना कोणीही परस्पर नळजोडणी करू नये, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Water from 15 to 3 days in Yeola