वाटेला याल, तर आडवे करू - एकनाथ शिंदेंचा भाजपाला इशारा
By Admin | Updated: March 26, 2016 14:55 IST2016-03-25T22:53:10+5:302016-03-26T14:55:46+5:30
शिवसेना कोणाच्या वाटेला जात नाही, पण शिवसेनेच्या वाटेला याल तर आडवे केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा एकनाथ शिंदेनी दिला.

वाटेला याल, तर आडवे करू - एकनाथ शिंदेंचा भाजपाला इशारा
नाशिक : शिवसैनिकांना डिवचण्याचे काम काही जण करत आहेत. शिवसेना कोणाच्या वाटेला जात नाही. शिवसेनेच्या वाटेला याल तर आडवे केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे नाव न घेता भाजपाला अप्रत्यक्षपणे दिला.
दोन दिवसांपूर्वीच वेगळ्या मराठवाड्याविषयी वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांची सभा शिवसैनिकांनी उधळून लावली होती. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. याची गंभीर दखल शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. २५) शिंदे यांना नाशिकला पाठवून शिवसैनिकांची भेट घेऊन त्यांना आधार देण्यास सांगितले होते.