दहशतवाद्यांचा चेहरा टिपणारे घड्याळाचे ‘पॅनिक बटण’
By Admin | Updated: July 3, 2016 23:54 IST2016-07-03T23:24:24+5:302016-07-03T23:54:20+5:30
नाशिकच्या तरुणाचा शोध : ओबामांकडून कौतुक; पंतप्रधानांना प्रात्यक्षिक दाखविणार

दहशतवाद्यांचा चेहरा टिपणारे घड्याळाचे ‘पॅनिक बटण’
सतीश डोंगरे ल्ल नाशिक
अब्जावधी लोकसंख्या असलेल्या जगात दहशतवाद्यांचा चेहरा ओळखणे कठीण होत असल्यानेच जगाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात दहशतवादी हल्ले घडवून निष्पापांचे बळी घेत आहेत. दहशतवादी केवळ विकसनशील राष्ट्रालाच निशाणा बनवित आहेत असे नाही, तर विकसित राष्ट्रांसमोरदेखील त्यांनी आव्हान निर्माण केले आहे. अशा दहशतवाद्यांचा खरा चेहरा उघडकीस आणण्यासाठी नाशिकच्या तरुणाने एक घड्याळ तयार केले असून, त्यातील ‘पॅनिक बटण’ दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी साहाय्यभूत ठरणार आहे. या घड्याळाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी कौतुक केले असून, सुरक्षेकरिता हे घड्याळ जगाच्या कानाकोपऱ्यात फायदेशीर ठरेल, असे गौरवोद्गार काढले आहेत.