शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

अनर्थ टळला : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर विचित्र अपघातात २२ किरकोळ जखमी; जखमींमध्ये वारकºयांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 17:17 IST

त्र्यंबकेश्वर-नाशिक रस्त्यावरील अंजनेरी शिवारात एका अपघाती वळणावर अचानकपणे पुढे जाणा-या वाहनाने ब्रेक लावल्याने पाठीमागून येणारी वाहने एकापाठोपाठ एकमेकांवर येऊन आदळली.

ठळक मुद्देविचित्र भीषण अपघातात २२ प्रवाशी किरकोळ स्वरुपात जखमीत्र्यंबकेश्वरकडून नाशिककडे येणारा वारक-यांचा ट्रॅक्टर (एम.एच३८.बी.१०६०), महिंद्र जीप (एम.एच १५ ईक्यू ७६४८)जखमींना त्र्यंबकेश्वर ग्रामिण रुग्णालयात हलविले.

नाशिक : काळ आला होता; पण वेळ नाही...दैव बलवत्तर असल्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर झालेल्या विचित्र भीषण अपघातात २२ प्रवाशी किरकोळ स्वरुपात जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन बस, जीप, ट्रॅक्टर अशा एकूण चार वाहनांमध्ये अपघाताची घटना त्र्यंबकेश्वर-नाशिक रस्त्यावरील अंजनेरी शिवारात एका अपघाती वळणावर अचानकपणे पुढे जाणा-या वाहनाने ब्रेक लावल्याने पाठीमागून येणारी वाहने एकापाठोपाठ एकमेकांवर येऊन आदळली. यामुळे बस, ट्रॅक्टर, जीप मधील सुमारे २२ प्रवाशी किरकोळ स्वरुपात जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी सांगितली. या अपघातात त्र्यंबकेश्वरकडून नाशिककडे येणारा वारक-यांचा ट्रॅक्टर (एम.एच३८.बी.१०६०), महिंद्र जीप (एम.एच १५ ईक्यू ७६४८), पिंपळगाव आगाराची बस (एम.एच१२ ईएफ ६९१५), मनमाड आगाराची बस (एमएच ४०.एन.८८००) ही चार वाहने अपघातग्रस्त झाली आहेत. अपघाताची माहिती मिळताच तातडीने त्र्यंबके श्वर ग्रामिण रुग्णालयात सज्ज असलेल्या राज्य शासनाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचल्या. अपघातग्रस्त वाहनांमधून त्वरित स्थानिक नागरिक व पोलिसांनी जखमींना बाहेर काढत रुग्णवाहिकेत बसवून त्र्यंबकेश्वर ग्रामिण रुग्णालयात हलविले. जखमींची संख्या अधिक असल्यामुळे जिल्हा रुग्णालय, नाशिकवरूनही रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या होत्या. तीन जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातात वाहनांचे नुकसान अधिक असले तरी प्रवाशांना जास्त गंभीर मार लागलेला नसून सर्व प्रवाशी किरकोळ जखमी असल्याचे त्र्यंबकेश्वर पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :Nashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर