हजारो लिटर पाणी वाया

By Admin | Updated: September 30, 2016 02:33 IST2016-09-30T01:59:46+5:302016-09-30T02:33:00+5:30

वडाळा-पाथर्डीरोड : महिनाभरापासून पाणीगळती

Waste thousands of liters of water | हजारो लिटर पाणी वाया

हजारो लिटर पाणी वाया

सिडको : वडाळा-पाथर्डीरोड येथील पार्कसाईड रेसिडेन्सीच्या प्रवेशद्वारासमोरील मुख्य रस्त्यात असलेल्या व्हॉल्व्हमधून गेल्या महिनाभरापासून पाणीगळती होत असून, दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असतानाही महापालिकेकडून याकडे दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मागील वर्षी जेमतेम पाऊस झाल्याने मनपाच्या वतीने संपूर्ण शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्यात आली होती. याउलट यंदा मात्र धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने मनपाच्या वतीने पाण्याची उधळपट्टी केली जात असल्याचे दिसून येत
आहे.
वडाळा-पाथर्डीरोडच्या बाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारती उभ्या केल्या गेल्या आहेत. याच भागातील पार्कसाईड रेसिडेन्सीच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरील मुख्य रस्त्यात असलेल्या व्हॉल्व्हमधून गेल्या काही दिवसांपासून पाणीगळती होत असून यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असतानाही याकडे महापलिकेकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. व्हॉल्व्हमधून पाणीगळती होणे व मुख्य जलवाहिनी फुटणे या व अशा अनेक प्रकारांमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असतानाही मनपा अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नाही. सामाजिक कार्यकर्ते किशोर गरड व परिसरातील नागरिकांनी याबाबत मनपास कळवूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कामकाज न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकारच नसल्याचेही नागरिकांकडून बोलले जात
आहे. (वार्ताहर)

Web Title: Waste thousands of liters of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.