शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

अनर्थ टळला : इंदिरानगर, वडाळागावात प्लॅस्टिक भंगार वस्तूंना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 16:34 IST

भूखंडावरील वाळलेल्या गवतानेही पेट घेतला होता. कचरा पेटला असल्याचा विचार करत सुरुवातीला या आगीकडे परिसरातील नागरिकांनी दुर्लक्ष केले; मात्र आगीने क्षणार्धात रौद्रावतार धारण केला.

ठळक मुद्देआगीने क्षणार्धात रौद्रावतार धारण केलावडाळ्यातही कचऱ्याने घेतला पेट

नाशिक : परिसरातील श्रद्धाविहार कॉलनीजवळ असलेल्या नाल्याला लागून असलेल्या भूखंडावर अज्ञात गॅरेजचालकांनी भंगार मालाचा कचरा बेवारस स्थितीत रात्रीच्या सुमारास फेकला. या कचऱ्याने दुपारीस साडेबारा वाजेच्या सुमारास अचानकपणे पेट घेतला. प्लॅस्टिकचे मोठे तुकडे असल्यामुळे क्षणार्धात आगीने रौद्रावतार धारण केला. काळ्याकुट्ट धुराचे लोट आकाशात उठल्याने परिसरात घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन उपकेंद्राचे जवान बंंबासह घटनास्थळी दाखल झाले.रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने भंगार छाननी करण्याच्या उद्देशाने प्लॅस्टिकचा भंगार पेटविल्याचे बोलले जात आहे. यामुळे भूखंडावरील वाळलेल्या गवतानेही पेट घेतला होता. कचरा पेटला असल्याचा विचार करत सुरुवातीला या आगीकडे परिसरातील नागरिकांनी दुर्लक्ष केले; मात्र आगीने क्षणार्धात रौद्रावतार धारण केला. घटनास्थळ सैन्याच्या छावणीच्या संरक्षक कुंपणाजवळ असल्यामुळे टेहळणीवर असलेल्या जवानांनी धोका लक्षात घेत पाणी फेकून आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आग विझली नाही. यावेळी नागरिकांनी परिसरातील नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. बडोदे यांनी तत्काळ अग्निशमन मुख्यालयाशी संपर्क साधत मदत मागितली. अवघ्या काही मिनिटांत सिडको उपकेंद्राचा बंब घेऊन जवान घटनास्थळी पोहचले. पाण्याचा मारा करत जवानांनी आग पंधरा ते वीस मिनिटांत आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.

 

वडाळ्यातही कचऱ्याने घेतला पेटवडाळागावातील श्रीश्री रविशंकर मार्गावरील तैबानगरजवळ असलेल्या एका पडीक बांधकामाच्या जागेत असलेला प्लॅस्टिक कचºयाचा ढीग अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने मोठी आग लागली होती. प्लॅस्टिक भंगार वस्तूंचा कचरा पेटल्यामुळे काळाकुट्ट धूर आकाशात दिसत होता. तसेच आगीच्या ज्वालाही धगधगत होत्या. पडीक बांधकामाच्या ठिकाणी संरक्षक भिंत असल्यामुळे आग पसरली नाही. या पडीक बांधकामाला लागून नागरिकांची घरे आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आगीवर पाणी टाकून आग विझविली. या पडीक जागेत परिसरातील गॅरेजधारक, भंगार मालाचा व्यवसाय करणारे व्यावसायिक कचरा आणून टाकत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. महापालिकेने उघड्यावर कचरा, तसेच टाकाऊ साहित्य फेकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलfireआग