शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

विरोधकांना सावधानतेचा इशारा देणारे निकाल

By किरण अग्रवाल | Published: May 24, 2019 2:30 AM

लोकसभा निवडणुकीचा जिल्ह्यातील निकाल अगदीच अनपेक्षित नसला तरी, येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने विरोधकांना सावधानतेचा इशारा देणाराच आहे. विशेषत: ...

ठळक मुद्दे जिल्ह्यातील निकाल अगदीच अनपेक्षित नसला तरी, येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने विरोधकांना सावधानतेचा इशारा देणाराच आहे.कोकाटे व पवार या दोघांच्याही बरोबरीचे मताधिक्य घेऊन गोडसे निवडून आले याचा अर्थ मतविभाजनाच्या नफानुकसानीचे अंदाज साफ कोसळले.भुजबळांच्या येवला व नांदगाव विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवारास मताधिक्य लाभले. यावरून तेथील राजकीय हवेचा अंदाज बांधता यावा

लोकसभा निवडणुकीचा जिल्ह्यातील निकाल अगदीच अनपेक्षित नसला तरी, येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने विरोधकांना सावधानतेचा इशारा देणाराच आहे. विशेषत: काँग्रेस व राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदारसंघात युतीच्या उमेदवारांना मिळालेल्या मताधिक्याकडे ‘मोदी फॅक्टर’ म्हणून पाहता येणारे असले तरी, त्याला सहज म्हणून घेता येऊ नये.नाशिकमधूनहेमंत गोडसेदिंडोरी येथून डॉ. भारती पवार हे दोन्ही उमेदवार सुमारे दोन लाखांच्या फरकांनी निवडून आले आहेत. नाशिकमध्ये अठरा उमेदवार रिंगणात असले तरी प्रामुख्याने तिरंगी ते चौरंगी लढतीच्या अपेक्षा केल्या जात होत्या. दिंडोरीतही आठ उमेदवार होते, पण तिरंगी लढत होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार असतानाही दोन लाखांचे मताधिक्य लाभावे, ही साधी बाब नाही. यात अंतिमत: पंतप्रधान मोदी यांचाच करिष्मा कामी आलेला असला तरी विरोधकांना, मग ते पक्ष असो की उमेदवार; आपल्याबद्दलची विश्वासार्हता निर्माण करता आली नसल्याचेच म्हणता यावे.नाशकात अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्यामुळे होणाऱ्या मतविभाजनाचा लाभ भुजबळ यांना तर वंचित आघाडीचे पवन पवार यांच्यामुळे घडून येणाºया मतविभाजनाचा फायदा गोडसे यांना होण्याची अटकळ बांधली जात होती; परंतु कोकाटे व पवार या दोघांच्याही बरोबरीचे मताधिक्य घेऊन गोडसे निवडून आले याचा अर्थ मतविभाजनाच्या नफानुकसानीचे अंदाज साफ कोसळले. का झाले असावे असे, तर लोकसभेसाठीच्या मोठ्या निवडणुकीत राजकीय पोकळी भरून काढू पाहणाºया पक्षांना अगर उमेदवारांना संधी न देण्याचीच अधिकतर मानसिकता मतदारांची असते. नाशकात तेच दिसून आले.विशेषत: भुजबळांच्या येवला व नांदगाव विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवारास मताधिक्य लाभले. यावरून तेथील राजकीय हवेचा अंदाज बांधता यावा जो आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरावा.लोकसभेची व विधानसभेची गणिते वेगवेगळी असतात हे खरे असले तरी, लोकभावनांकडे दुर्लक्ष करता येऊ नये एवढा धडा तरी या निकालातून नक्कीच घेता यावा. कारण, ज्या पद्धतीने लोकसभेसाठी प्रचाराचे रण माजलेले दिसून आले त्याचीच पुनरावृत्ती तेव्हा होणे निश्चित आहे.की फॅक्टर काय ठरला?गोडसे यांच्याकडे पूर्णवेळ खासदार म्हणून बघितले गेले. आजपर्यंत खासदारकी भूषविलेल्या अन्य मान्यवरांनी पक्षातील जबाबदाऱ्यांसह अन्य सहकारी संस्थामध्येही आपली खुर्ची शाबूत ठेवून खासदारकी राखली होती. गोडसे यांनी अन्य संस्थांमध्ये मन न गुंतविल्याने त्यांचे विरोधक कमी होते.नाशकात छगन भुजबळ यांच्याबद्दल जशी सहानुभूतीची भावना व्यक्त होते तशी परिस्थिती समीर यांच्याबाबत नाही. भुजबळांना मध्यंतरी कारागृहात राहावे लागल्याने पक्ष संघटना खिळखिळी झाली आहे. त्याचा लाभ समोरच्या उमेदवारास आपसूक झाला.भारती पवार यांनी राष्ट्रवादीतून येऊन भाजपची उमेदवारी घेतली असली आणि विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी डावलली गेली  असली तरी, चव्हाण उघडपणे विरोधाची भूमिका घेऊ शकले नव्हते. शिवाय, चव्हाण यांच्यासाठी पक्षाशी विद्रोह करणे स्वत:च्याच पायावर कुºहाड पाडून घेणारे ठरु शकते हे जाणून पक्षनेते प्रामाणिकपणे राबले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnashik-pcनाशिकdindori-pcदिंडोरीHemant Godseहेमंत गोडसेSameer Bhujbalसमीर भुजबळ