शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

सतर्कतेचा इशारा : गंगापूरमधून लवकरच होणार हंगामातील पहिला विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 13:54 IST

नाशिक : यंदा पावसाला उशिरा सुरूवात झाली असली तरी जुलै महिन्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने गंगापूर धरण ८० टक्क्यांपर्यंत ...

ठळक मुद्दे१००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.गोदापात्रात २ हजार ४३८ क्युसेक पाणी गोदावरीत प्रवाहित होणार आहे.विसर्ग हळहळु सायंकाळपर्यंत २००० क्युसेकपर्यंत वाढविला जाणार आहे.

नाशिक : यंदा पावसाला उशिरा सुरूवात झाली असली तरी जुलै महिन्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने गंगापूर धरण ८० टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने गंगापूर धरणातून सोमवारी (दि.२९) दुपारी १००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. हा विसर्ग हळहळु सायंकाळपर्यंत २०००पर्यंत वाढविला जाणार आहे. त्यामुळे होळकर पूलाखालून गोदापात्रात २ हजार ४३८ क्युसेक पाणी गोदावरीत प्रवाहित होणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे. गोदाकाठी असलेल्या रहिवाशांना तसेच विक्रेत्यांना तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आदेश दिले गेले आहे. तसेच गोदाकाठालगत सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.गंगापूर धरणातून विसर्ग झाल्यानंतर होळकर पुलापर्यंत पाणी दीड तासांत पोहचण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. होळकर पूलापासून पुढे नदीपात्र उथळ असल्यामुळे पाणी उसळ्या घेऊन अधिक वेगाने टाळकुटेश्वर व लक्ष्मीनारायण पुलाखालून वाहणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी तत्काळ गोदापात्रापासून सुरक्षितस्थळी निघून जावे, असे आवाहन केले जात आहे. आपली दुकाने, वाहने गोदापात्रापासून तत्काळ काढून घ्यावी असे आवाहन महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाने केले आहे. गोदापात्रात वाढलेले पाणी बघण्यासाठी व फोटोसेशन करण्यासाठी कोणीही पुलांवर गर्दी करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. अहल्यादेवी होळकर पूल, संत गाडगे महाराज पूल, लक्ष्मीनारायण पुलावर बघ्यांनी गर्दी करू नये, तसेच सेल्फी वगैरे घेण्याचा धोकादायक प्रयत्न करू नये असे आवाहन उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केले आहे. वाहतूकीला अडथळा निर्माण झाल्यास पुलावर उभ्या केलेल्या वाहनांच्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पंचवटी, भद्रकाली, सरकारवाडा या तीनही पोलीस ठाण्यांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त घारपुरे घाट ते तपोवनापर्यंत नदीकाठालगत व पुलांवर असणार आहे. या हंगामातील हा पहिलाच विसर्ग नदीपात्रात होत आहे. गंगापूर धरणाचा जलसाठा ४ हजार ४२२ दलघफूपर्यंत पोहचला आहे. गंगापूर पाणलोट क्षेत्रात मध्यरात्रीपासून पाऊस सुरू आहे. सकाळनंतर पावसाचा जोर अधिक वाढल्याने पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाकडून घेण्यात आला आहे.

 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलgangapur damगंगापूर धरणgodavariगोदावरीRainपाऊस