सफला एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्वरला वारकऱ्यांची गर्दी
By Admin | Updated: December 26, 2016 01:33 IST2016-12-26T01:33:26+5:302016-12-26T01:33:40+5:30
सफला एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्वरला वारकऱ्यांची गर्दी

सफला एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्वरला वारकऱ्यांची गर्दी
त्र्यंबकेश्वर : श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे सफला एकादशीनिमित्त संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिरात वारकऱ्यांची एकत्र एकच गर्दी झाली होती. शनिवार त्याबरोबरच एकादशी यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी झाली होती. आजपासून एक महिन्याने पौष वद्य एकादशी अर्थात षटतिला एकादशीला निवृत्तिनाथ महाराजांचा यात्रोत्सव असतो. सफला एकादशीला मुहूर्त साधत हजारो वारकरी नाथांच्या समाधीसमोर नतमस्तक झाले.
नाताळच्या सुट्यांमध्ये त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी तसेच कुशावर्त तीर्थ, संत निवृत्तिनाथांची संजीवन समाधीसह परिसरातील निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी अनेक भाविक त्र्यंबकेश्वरला हजेरी
लावतात. निवृत्तिनाथ मंदिर परिसरातील दुकानदारांसह हॉटेल व्यावसायिकांना गर्दीमुळे सुगीचे दिवस आले आहेत. निवृत्तिनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, विश्वस्त पुंडलिकराव थेटे, रामभाऊ मुळाणे आदिंनीही नाथांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सवाच्या नियोजनाबाबत चर्चा केली. (वार्ताहर)