वऱ्हाडाच्या ट्रकला अपघात

By Admin | Updated: May 22, 2017 02:07 IST2017-05-22T02:06:33+5:302017-05-22T02:07:05+5:30

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबककडून मोखाड्याकडे जाणाऱ्या वऱ्हाडाच्या ट्रकला रविवारी दुपारी भांग्या देवाच्या मंदीराजवळ गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने अपघातात एकूण २८ जणांना किरकोळ दुखापती झाल्या.

Wardha Trak road accident | वऱ्हाडाच्या ट्रकला अपघात

वऱ्हाडाच्या ट्रकला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबककडून मोखाड्याकडे जाणाऱ्या वऱ्हाडाच्या ट्रकला रविवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान भांग्या देवाच्या मंदीराजवळ उताराला गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने आयशर एम.एच. १५ सी.के. १७२७ या क्र मांकाचा ट्रक पलटी होता होता वाचला व अडकला. तथापि ट्रक पलटी झाला नाही. मात्र या अपघातात एकूण २८ जणांना किरकोळ दुखापती झाल्या.
या सर्वांवर त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांनतर २४ रु ग्णांना घरी पाठविण्यात आले. तर रोहीदास झुंजुरडे (१७), सुरेश ढाले (१९), राजाराम देवराम मोरे (६२), हर्षद भागवत बोरसे (१४) सर्व राहणार घनशेत ता. पेठ येथील रहिवासी आहेत. नवरदेव व नवरी घरी पोहचवुन हे सर्व घरी चालले होते, हे सर्व एकाच घरातील आहेत. चारही जखमींना जिल्हा रु ग्णालयात पोहचविण्यात आले आहे. याबाबत पोलिस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बापु अहिरे तपास करीत आहेत.

Web Title: Wardha Trak road accident