दूषित पाणी पुरवठ्यावरून प्रभाग सभेत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:36 IST2021-01-13T04:36:41+5:302021-01-13T04:36:41+5:30

नाशिकरोड प्रभाग समितीची बैठक सभापती जयश्री खर्जुल यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, विभागीय अधिकारी दिलीप मेनकर यांच्या ...

Ward meeting over contaminated water supply | दूषित पाणी पुरवठ्यावरून प्रभाग सभेत खडाजंगी

दूषित पाणी पुरवठ्यावरून प्रभाग सभेत खडाजंगी

नाशिकरोड प्रभाग समितीची बैठक सभापती जयश्री खर्जुल यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, विभागीय अधिकारी दिलीप मेनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी घेण्यात आली. यात बिटको रुग्णालयातील रुग्णांची होणारी गैरसोय, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तसेच साधनसामग्री, औषधे यांचा तुटवडा, अस्वच्छता यावरुन नगरसेवक प्रशांत दिवे, जगदीश पवार, सत्यभामा गाडेकर यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. बिटको कोविड सेंटरमध्ये डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. आता कोविड रुग्णांची संख्या कमी झाल्याने गरज असेल तितकेच कर्मचारी व डॉक्टर तेथे ठेवून अन्य डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मूळ बिटको रुग्णालयात रुजू करावे, अशी मागणी करण्यात आली.

तीन दिवसांपासून पाणीपुरवठा विभागाने चेहेडी बंधाऱ्यातून दुर्गंधीयुक्त दूषित पाणी उचलून नाशिकरोडला पाणीपुरवठा केल्याने नगरसेवक दिनकर आढाव, संभाजी मोरुस्कर, पंडितराव आवारे आदींनी प्रशासनाला फैलावर घेतले. नगरसेवक प्रशांत दिवे यांनी मंगळवारच्या अंकात नाशिकरोड भागातील दूषित पाणीपुरवठा प्रसिद्ध झालेली ‘लोकमत’चा अंक सभागृहात आणून बेजबाबदारपणे दूषित पाणीपुरवठा केल्याप्रकरणी प्रश्न उपस्थित केला. जेलरोड प्रभाग १७ मध्ये दोन वर्षापूर्वी पाण्याच्या टाकीला पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकण्याच्या कामाची वर्कऑर्डर झाली असून, पाईपही खरेदी करण्यात आले आहे. त्याचे पैसे मनपाने ठेकेदाराला दिले आहेत. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नगरसेवकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. नगरसेवक सुनील गोडसे यांनी उपनगर सिग्नल ते बिटकोदरम्यान दुभाजकात एलईडी लाईट लावण्याबाबत होणाऱ्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली. बैठकीला नगरसेविका ज्योती खोले, संगीता गायकवाड, सुनीता कोठुळे, प्रभाग समिती सदस्य शंकर साडे, कांता वराडे आदी उपस्थित होते.

चौकट==

बाक बसविण्याची नगरसेवकांमध्ये स्पर्धा

नाशिकरोड प्रभाग समितीच्या बैठकीत विषय पत्रिकेवर एकूण ४४ विषय होते. त्यापैकी सुमारे पावणेदोन कोटींचे ३७ विषय डीलक्स, व्हिक्टोरिया, व्हिंटेज प्रकारचे बाक लावण्याच्या विषयांना वित्तीय व प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. निवडणूक जवळ येत असून, गेल्या अकरा महिन्यांपासून कोरोनामुळे मोठ्या कामांना मंजुरी मिळणे अवघड झाले होते. त्यामुळे छोट्या छोट्या रकमेचे बाक लावण्याचे विषय मंजूर करून त्यावर संबंधित नगरसेवकाच्या नावाचा फलक लावण्यात येणार आहे.

Web Title: Ward meeting over contaminated water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.