‘पांडुरंग पांडुरंग’च्या जयघोषात वारकऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:15 IST2021-07-28T04:15:12+5:302021-07-28T04:15:12+5:30

नांदगाव : ‘पांडुरंग पांडुरंग’च्या जयघोषात दंग झालेल्या शेकडो वारकऱ्यांनी आसमंत दुमदुमून टाकला. वारकरी संप्रदायातील संत महात्मे यांचा ...

Warakaris honored in the triumph of 'Pandurang Pandurang' | ‘पांडुरंग पांडुरंग’च्या जयघोषात वारकऱ्यांचा सन्मान

‘पांडुरंग पांडुरंग’च्या जयघोषात वारकऱ्यांचा सन्मान

नांदगाव : ‘पांडुरंग पांडुरंग’च्या जयघोषात दंग झालेल्या शेकडो वारकऱ्यांनी आसमंत दुमदुमून टाकला. वारकरी संप्रदायातील संत महात्मे यांचा सन्मान सोहळा गुप्ता लॉन्समध्ये संपन्न झाला. आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव व मालेगाव तालुक्यातून हजेरी लावलेल्या संतांचा पुष्पहार घालून व विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमा भेट देऊन सन्मान केला.

व्यासपीठावर राजीव महाराज व महेशगिरी म.(अजंदे), बालब्रह्मचारी सोमेश्वरानंद म.(बोयगाव), विकासगिरी म.(कोपरगाव), ब्रह्मगिरी म.(बाणगाव), सर्वानंद गिरी म. (सासेगाव), जयराम म. (गोंडेगाव), रामदास म.(ढेकू), देविदा म. (धनेर), शिवाजी म.(भालूर), शंकर महाराज शास्त्री (धाडी), समाधान म. (निंबायती), शरद म. (चौकटपाडे), बाबाजी म.(जेजुर), रामकृष्ण म. (बाणगाव), वाल्मिक म. (टाकळी), संजय म. दुकळे, नामदेव म. (खायदे), औचिदानंद म. (अस्तगाव), विनायकज म. (लोहशिंगवे) होते. स्पर्धा परीक्षेत राज्यात पहिला आलेल्या वेदांत घुगे यास आमदार कांदे यांनी २१,००० रुपयांची मदत जाहीर केली. बापूसाहेब कवडे यांनी मनमाड पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आ. कांदे यांनी उचललेले पाऊल पहिलेच पाऊल आहे, असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक बाळकृष्ण महाराज(जळगाव बु.) यांनी केले.

------------------

वारकरी भवनची निर्मिती करू

नांदगाव व मनमाड शहरात वारकरी भवनाची निर्मिती करू, त्यासाठी संत सदस्य ट्रस्टची नोंदणी करून द्यावी. शिवसेना महाविकास आघाडीचा एक भागीदार असल्याने वारीला परवानगी देताना अडचणी आल्या; मात्र मतदार संघात नियम पाळून कीर्तन, सप्ताहातून प्रबोधन सुरू करावे, मी आपल्या बरोबर आहे, असे आश्वासन आ. सुहास कांदे यांनी उपस्थित संतांना दिले. दीड वर्षांपासून भागवत सप्ताह, कीर्तन, प्रवचन आदि धार्मिक उत्सवास बंदी असल्याने, या कार्यक्रमास आता परवानगी द्यावी, तालुक्यात २५० कीर्तनकार आहेत. नांदगाव व मनमाड येथे वारकरी भवन व्हावे, यासह ‘भेटी लागी जीवा लागलीसे आस’ अशी आळवणी करून, पंढरीची वारी चुकल्यामुळे कासावीस झालेल्या वारकरी वर्गाची व्यथा अनेकांनी मांडली.

--------------------

नांदगाव येथे वारकरी सन्मान सोहळ्यात व्यासपीठावर उपस्थित कीर्तनकार, संत, महात्मे व आमदार सुहास कांदे. (२७ नांदगाव २)

270721\27nsk_8_27072021_13.jpg

२७ नांदगाव २

Web Title: Warakaris honored in the triumph of 'Pandurang Pandurang'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.