धार्मिक कार्यक्रमांवरील बंदी उठविण्याची वारकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:11 IST2021-07-18T04:11:32+5:302021-07-18T04:11:32+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने अनेक गोष्टींवर बंधने घातली. त्यात मंदिर तसेच धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. शासनाने सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेला ...

Warakaris demand lifting of ban on religious programs | धार्मिक कार्यक्रमांवरील बंदी उठविण्याची वारकऱ्यांची मागणी

धार्मिक कार्यक्रमांवरील बंदी उठविण्याची वारकऱ्यांची मागणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने अनेक गोष्टींवर बंधने घातली. त्यात मंदिर तसेच धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. शासनाने सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय योग्य होता, मात्र इतर बाबींचा विचार केला तर लग्न, छोटे-मोठे समारंभ सर्वत्र मोठ्या गर्दीत साजरे होत असून कोरोना नियमावलीचे सर्रास उल्लंघन होत असताना फक्त धार्मिक कार्यक्रमांमुळेच कोरोना संसर्ग वाढतो का, असा प्रश्न वारकरी संप्रदायाकडून विचारला जात आहे. कोणताही धार्मिक पंथ असो, यावर शासनाने एक प्रकारे निर्बध लावून अन्यायच केला आहे. शासनाने बंडातात्या कराडकर यांना स्थानबद्ध केल्याचाही वारकरी संप्रदायाकडून शासनाचा निषेध करण्यात आला. शासनाने धार्मिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर वारकरी समाज संप्रदायाचे तालुकाध्यक्ष हभप अविनाश महाजन, जिल्हा मार्गदर्शक हभप संजय धोंडगे,

तात्याभाऊ सावंत, सुभाष बच्छाव, पुंडलिक सानप, विलास जोशी, दिनकर पगार, नारायण जाधव, किसन आहेर, काकाजी शिंदे, भास्कर शिंदे, दादाभाऊ आहेर, सुदाम महाराज, रामनाथ महाराज, बापू महाराज कुंभार्डेकर, गोविंद महाराज कुंभार्डेकर, गणेश महाराज, गणेश पुरीजी देवदारेश्वर, गोरख निकम, हिरामण गांगुर्डे, चंद्रकांत सावंत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो- १७ देवळा वारकरी

नायब तहसीलदार गायकवाड यांना निवेदन देताना वारकरी महामंडळाचे तालुकाध्यक्ष अविनाश दादा महाजन, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बच्छाव, जिल्हा मार्गदर्शक संजय नाना धोंडगे, तात्याभाऊ सावंत, काका शिंदे.

170721\17nsk_33_17072021_13.jpg

फोटो- १७ देवळा वारकरी  नायब तहसिलदार गायकवाड यांना निवेदन देताना वारकरी महामंडळाचे तालुकाध्यक्ष अविनाश दादा महाजन, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बच्छाव, जिल्हा मार्गदर्शक संजय नाना धोंडगे, तात्याभाऊ सावंत,काका शिंदे. 

Web Title: Warakaris demand lifting of ban on religious programs