युवकावर धारदार शस्त्राने वार
By Admin | Updated: November 30, 2014 00:40 IST2014-11-30T00:39:32+5:302014-11-30T00:40:12+5:30
युवकावर धारदार शस्त्राने वार

युवकावर धारदार शस्त्राने वार
नाशिक : मोबाइलवर बोलत जाणाऱ्या युवकाची कुरापत काढून त्याच्यावर तिघा संशियतांनी धारदार शस्त्रांनी वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे़ बोरगड परिसरातील एकतानगर येथे राहणारा अजय हरिश्चंद्र खंबायत (१८) हा युवक शुक्र वारी रात्री ९ वाजेच्या सुमारास पंचवटीतील पवार लॉन्सजवळ मोबाइलवर बोलत होता. त्यावेळी तीन संशियत त्यांच्याजवळ आले व त्यांनी तू कोणाला बोलतो आहे, अशी कुरापत काढून धारदार शस्त्राने वार केले़ या घटनेनंतर हे तिघेही फरार झाले़ याप्रकरणी खंबायत याने दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)