वणी येथे सव्वा लाख लांबविले

By Admin | Updated: May 23, 2014 00:34 IST2014-05-22T23:54:13+5:302014-05-23T00:34:08+5:30

वणी : घरातील अल्पवयीन मुलांना बोलण्यात गुंतवून लाकडी पेटीतील एक लाख २८ हजार रुपयांची रोख रक्कम तीन सराईत संशयितानी लांबविली.

Wani is worth a hundred lakhs here | वणी येथे सव्वा लाख लांबविले

वणी येथे सव्वा लाख लांबविले

वणी : घरातील अल्पवयीन मुलांना बोलण्यात गुंतवून लाकडी पेटीतील एक लाख २८ हजार रुपयांची रोख रक्कम तीन सराईत संशयितानी लांबविली असून, एका संशयिताला पकडण्यात यश आले आहे, तर उर्वरित दोन फरारींचा पोलीस शोध घेत आहेत. वनारे शिवारात भरदिवसा आज दुपारी २ वाजता तीन संशयित तरुण जिव्हाळा कॉलनीलगत अंबाडी नदी परिसरात नामदेव काशीनाथ झिरवाळ यांचे घरी आले. घरात तुषार नामदेव झिरवाळ व खुशाल नामदेव झिरवाळ ही दोन बालके असल्याची संधी साधत अजय हरिश गांगुर्डे, रा. वणी हा पाळत ठेवण्यासाठी बाहेर थांबला तर नितीन पुंडलीक मोरे (रा. दूधखेड, ता. चांदवड), रवि ऊर्फ भावड्या निखाडे (संगमनेर, ता. दिंडोरी) हे दोघे घरात शिरले व घरातील दोन बालकांना बोलण्यात गुंतवून घरातील दुसर्‍या खोलीत असणार्‍या लाकडी पेटीचे कुलूप कुºहाडीने तोडून त्यातील एक लाख २८ हजार रुपये लांबविले. दरम्यान, शेतात वैरण आणण्यासाठी गेलेले झिरवाळ कुटुंबीयांचे सदस्य घराजवळ आल्याचे अजय गांगुर्डे यांनी पाहतच त्याने आत असलेल्या दोघांना सुचक इशारा केला तेव्हा घरातील दोघे संशयित दुसर्‍या बाजूने बाहेर पडले व पल्सर मोटारसायकलवर बसून निघून गेले. तेव्हा अजय गांगुर्डे पळण्याच्या तयारीत असताना संशयावरून त्याला पकडले व घरातील तपासणी केली असता एक लाख अठ्ठावीस हजारांची रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसात कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अजय गांगुर्डे याला ताब्यात घेतले. जमिनीच्या लेव्हलिंगसाठी व घरातील लग्नकार्यासाठी ही रक्कम घरात ठेवल्याची माहिती नामदेव झिरवाळ यांनी दिली. गुन्ह्यात वापरण्यात आलेली पल्सर ही निफाड येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, दिवसाढवळ्या जबरी लूट करणार्‍या संशयितांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याची बाब पुढे आल्याने वणी व परिसरात यापूर्वी झालेल्या जबरी चोर्‍यांशी या संशयितांचा संबंध आहे किंवा असे याबाबत सपोनि शंकर बाबर, पोउनि अदमाने, के. टी. खैरनार तपास करीत आहे. नामदेव झिरवाळ यांच्या फिर्यादीवरून संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Wani is worth a hundred lakhs here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.