शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:38 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील कायम दुर्लक्षित असणारे शिरसाटे गाव. १२०० च्या जवळपास लोकसंख्या. गावात ६४ लाख रुपयांच्या खर्चाची नळ ...

घोटी : इगतपुरी तालुक्यातील कायम दुर्लक्षित असणारे शिरसाटे गाव. १२०० च्या जवळपास लोकसंख्या. गावात ६४ लाख रुपयांच्या खर्चाची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर असून, पाणीपुरवठा करणारी विहीरही खोदून तयार आहे.तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी खोदलेली विहीर या योजनेसाठी  नको म्हणून नवीन पदाधिकाऱ्यांनीनव्या विहिरीसाठी पाठपुरावा सुरू केला  आहे.  वाढत्या अंतर्गत राजकारणामुळे बांधलेल्या विहिरीला पाणी असूनही शिरसाटे ग्रामस्थांना पाण्यासाठी आटापिटा करावा लागतो आहे. अनेकांनी या वादात मध्यस्थी  करूनही प्रश्न अद्याप अनुत्तरितच  आहे.ग्रामस्थांसाठी पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला असून, टँकरचे पाणी विहिरीत टाकले जाते. गावापासून विहीर एक किमीवर आहे. महिलांना वर्षभर पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. उन्हाळ्यात महिला तर जास्तच मेटाकुटीला येतात.टॅँकरवर भागते गावाची तहानइगतपुरी तालुक्यातील डोंगराळ भागात शिरसाटे गाव आहे. काही वर्षांपूर्वी या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ६४ लाख रु पये खर्चाची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. तत्कालीन सरपंच जनाबाई सदगीर यांनी सांजेगाव धरणाजवळ विहिरीसाठी जागा घेऊन स्वखर्चाने विहीर खोदली. या विहिरीला पुरेसा पाणीसाठा आहे. मधल्या काळात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. जुने पदाधिकारी जाऊन नव्या पदाधिकाºयांनी ग्रामपंचायतीत सत्ता संपादन केली. जुन्या पदाधिकाºयांनी केलेल्या कामाबाबत नव्या पदाधिकाºयांनी असमाधान दाखवून खोदलेली विहीर नाकारली व नव्याने विहीर खोदकाम सुरू करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले; मात्र या नव्या-जुन्याच्या वादामुळे ग्रामस्थ मात्र पाण्यासाठी व्याकूळ झाले आहेत. अनेकांनी या वादात केलेली मध्यस्थी निष्फळ ठरली आहे.४शिरसाटेची भीषण पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनानेगावात टँकर सुरू केलेला आहे. गावापासून एक किमी दूर असलेल्या सार्वजनिक विहिरीत टॅँकरचे पाणी टाकले जाते. एक टँकर गावासाठी कमी पडत असल्याने महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाण्याचा शोध घ्यावा लागतो. तहान भागविण्यासाठी सरकारी टँकरचा आधार घेतला जात असला तरी, या पाण्यामुळे गावकरी आजारी पडत आहेत, अशी माहिती काही ग्रामस्थांनी दिली. यामुळे या गावातील पाण्याचे संकट आता अधिकच भीषण होत चालले आहे. जनावरांच्या चाºयाचा प्रश्नदेखील गंभीर झाला आहे. पाण्याशिवाय माणसांनी व जनावरांनी जगायचे कसे व करायचे काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शिरसाटे गावातील जनतेला भीषण दुष्काळाची दाहकता सोसावीलागत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी