बारा फूट उंचीची भिंत कोसळली
By Admin | Updated: March 6, 2015 01:41 IST2015-03-06T01:37:26+5:302015-03-06T01:41:35+5:30
बारा फूट उंचीची भिंत कोसळली

बारा फूट उंचीची भिंत कोसळली
सिडको : रहदारीचा रस्ता व रस्त्याच्या दोन्ही बाजूला शाळा असलेल्या पाटीलनगर येथील बंद अवस्थेत असलेल्या मलनि:स्सारण केंद्राची सुमारे दहा ते बारा फूट उंचीची भिंत अचानक कोसळली. सुदैवाने यावेळी त्या ठिकाणी कोणीही नव्हते. यानंतर काही वेळातच मनपाच्या वतीने जीर्ण उर्वरित भिंतही पाडण्यात आली.सिडकोतील पाटीलनगर येथे गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी मोकळ्या जागेत मनपाच्या वतीने मलनि:स्सारण केंद्र सुरू करण्यात आले होते, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून मलनि:स्सारण केंद्र हे बंद अवस्थेत आहे. याच ठिकाणीची जीर्ण झालेली भिंत गुरुवारी सकाळच्या सुमारास अचानक कोसळली.
याबाबतची माहिती माजी नगरसेवक अण्णा पाटील यांना कळताच त्यांनी मनपास कळविले. भिंत कोसळली त्या समोरील रस्ता हा रहदारीची असून, याच रस्त्यांवर दोन्ही बाजूस शाळा आहे, सुदैवाने यावेळी शाळा सुटलेली नव्हती.
दरम्यान, काही वेळातच. मनपा विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, प्रभारी विभागीय अधिकारी पाडवी यांनी घटनास्थळी भेट देऊन जागेची पाहणी केली. मनपाच्या वतीने उर्वरित जीर्ण भिंतही पाडण्यात आली. (वार्ताहर)