शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षक दगडी भिंत कोसळून माय-लेक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 01:35 IST

उंटवाडी रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभाग (पश्चिम) कार्यालयाच्या पाठीमागील संरक्षक दगडी भिंतीजवळ खोदण्यात आलेल्या खड्ड्यात मुरूम टाकत असताना ट्रॅक्टरसह संरक्षक भिंत घरावर कोसळून झालेल्या घटनेत माय-लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि़७) सायंकाळच्या सुमारास घडली़

नाशिक : उंटवाडी रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभाग (पश्चिम) कार्यालयाच्या पाठीमागील संरक्षक दगडी भिंतीजवळ खोदण्यात आलेल्या खड्ड्यात मुरूम टाकत असताना ट्रॅक्टरसह संरक्षक भिंत घरावर कोसळून झालेल्या घटनेत माय-लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि़७) सायंकाळच्या सुमारास घडली़ सत्यभामा रमेश सरकटे (४५) व प्रकाश रमेश सरकटे (१८, नयनतारा इस्टेटच्या मागे, संभाजी चौक ) असे मृत्यू झालेल्या माय-लेकांची नावे आहेत़ या दुर्घटनेस सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका असे दोघेही जबाबदार असून, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर घाटे यांनी केली आहे़ दरम्यान, या घटनेची मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़दुसरीकडे जाण्यापूर्वीच घडली घटनासरकटे दाम्पत्य आपल्या मुलांसह दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी जाणार होते़ त्यांनी दुसरीकडे घर बघून त्यासाठी द्यावयाची अनामत रक्कमही ठरविली होती़ येत्या एक-दोन दिवसांत घरातील सामान दुसरीकडे घेऊन जायचे असल्याने त्यांनी किराणाही भरून ठेवला होता़ मात्र, तत्पूर्वीच झालेल्या या दुर्घटनेत माय-लेकाचा मृत्यू झाला़संरक्षक भिंतीलगतच अनेक खड्डेगत काही दिवसांपासून बांधकाम विभागाने या दगडी संरक्षक भिंतीलगत खड्डे खोदले असून, त्यामध्ये ट्रॅक्टरने मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे़ सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मुरूम टाकण्याचे काम सुरू असताना भिंत ढासळून दुर्घटना घडली.४ याठिकाणी भिंतीलगतच अनेक ठिकाणी खड्डे असल्यामुळे भुसभुशीत झालेल्या जमिनीवर ट्रॅक्टरचा दबाव आल्याने भिंत कोसळल्याची शक्यता वर्तविली जात आहे.सार्वजनिक बांधकामचे अधिकारी-कर्मचारी गायबसंरक्षक भिंत कोसळल्याच्या घटनेनंतर आपल्यावर कोणतीही जबाबदारी वा जाब विचारू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी मदतीसाठी धावण्याऐवजी गायब झाले होते़ विशेष म्हणजे या ठिकाणी खोदण्यात आलेले मोठमोठे खड्डे व त्यावर टाकला जात असणारा मुरूम नजरेत येऊ नये यासाठी एक प्रवेशद्वार लाकडे टाकून बंद करण्यात आले तर दुसºया प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक हे कोणालाही मध्ये जाऊ देत नसल्याचे चित्र होते़

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूNashikनाशिक