बळीराजाला पावसाची प्रतीक्षा

By Admin | Updated: June 6, 2016 23:37 IST2016-06-06T23:35:21+5:302016-06-06T23:37:39+5:30

बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यात खरीप हंगामाच्या नियोजनाची लगबग

Waiting for the rains | बळीराजाला पावसाची प्रतीक्षा

बळीराजाला पावसाची प्रतीक्षा

बेलगाव कुऱ्हे : संपूर्ण जिल्ह्यात भात लागवडीत अग्रेसर असलेल्या इगतपुरी तालुक्यात खरीप हंगामाच्या नियोजनाची लगबग सुरू झाली असून, काही ठिकाणी मशागतीची कामे आटोपली आहेत. दुष्काळात भरडलेल्या बळीराजाला आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत. तालुक्यातील १२६ महसुली गावांमध्ये वाड्या व वस्त्यांवरील शेतकरी भात, नागली, वरई, सोयाबीन आदि पिके घेतात. शेतकरी खरीप हंगामात इंद्रायणी, फुले समृद्धी, एक हजार आठ या जातीची भातपिके घेत असतात. तालुक्याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २३ हजार ३३२ हेक्टर असून, २०१५-१६चे खरीप पेरणीचे उद्दिष्ट्य ३१ हजार १७१ एवढे आहे.
मागच्या वर्षीचे पेरणीचे उद्दिष्ट्य ३१ हजार ४३१ होते, तर सरासरी ४७०० मिलीलिटर पर्जन्यमान झाले होते. यावर्षी चांगला पाऊस होण्यासाठी बळीराजा चक्क देवाला साकडे घालीत आहेत. पण अजूनही त्याची प्रतीक्षा संपलेली नाही.
२०१५-२०१६च्या खरीप हंगामाचे नियोजन करण्यासाठी ३२ हजार १७१ हेक्टर उद्दिष्ट्य असल्याची माहिती तालुका कृषी विभागाने दिली आहे.
गेल्या वर्षाचे लक्ष्यांक २६ हजार ५०१ हेक्टर होते, या क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झालेली असल्याने १०२ टक्के पेरणी झालेली होती.
चालू वर्षीच्या खरीप हंगामाचे भात पिकाचे लक्ष्यांक- २४९५०, तर उद्दिष्ट २६५०१ एवढे आहे. नागली लक्ष्यांक- १२०० (उद्दिष्ट ९९७), मका लक्ष्यांक २५० (उद्दिष्ट ३०९), कडधान्य— तूर, मूग, उडीद या पिकाचे लक्ष्यांक १७२, १६५, गळीत धान्य- भुईमूग लक्ष्यांक ५००, ६६८, सोयाबीन लक्ष्यांक- ६००, ७११, खुरसनी- लक्ष्यांक ९८३, ३२१ एवढे आहे.
गेल्या वर्षी खरीपपूर्व हंगामात अनेक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने भातपिकाचे नुकसान केले होते. उत्पादनातदेखील मोठी घट निर्माण झाली होती.
तालुक्यातील शेतकऱ्यांना नवनवीन पद्धतीचा अवलंब करण्याच्या पाशर््वभूमीवर तालुका कृषी विभागाकडून तालुक्यातील गावांमध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून पीक प्रात्याक्षिकाचे आयोजन करण्यात येणार आहे. शेतकरी खरीप हंगामासाठी विविध प्रकारची बी बियाणे घेतात यात होणारी फसवणूक टाळण्यासाठी शास्त्रज्ञ देखील मार्गदर्शन करणार आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजना ३१ जुलैपर्यंत अंतिम तारीख असून, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Waiting for the rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.