शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धरणक्षेत्रात पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 01:19 IST

: शहरासह जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप जोरदार पाऊस होऊ शकला नाही. धरणात पाणीसाठा कमी असल्याने नाशिकवर पाणीकपातीची वेळ आली

नाशिक : शहरासह जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप जोरदार पाऊस होऊ शकला नाही. धरणात पाणीसाठा कमी असल्याने नाशिकवर पाणीकपातीची वेळ आली असताना समूहात अद्यापही पुरेसा पाऊस नसल्याने नाशिकवरील पाणीसंकट कायम आहे. मागील आठवड्यात १३.६५ द.ल.घ.फू. असलेला साठा १३.३५ द.ल.घ.फू.वर आला असल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे नाशिककरांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.रविवारी (दि.३०) दिवसभरात पाणलोट क्षेत्रात केवळ ४२ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. शहरातही सकाळपासून पावसाच्या हलक्या सरींचा वर्षाव दिवसभर सुरू होता. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ३.९ मि.मी. इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली.मान्सून सरींचा वर्षाव शहरासह जिल्ह्यात सुरू झाला आहे; मात्र अद्याप पावसाने जोर धरला नसल्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात रविवारी सकाळपर्यंत १२, तर इगतपुरी तालुक्यात २३ आणि पेठ तालुक्यात सर्वाधिक १२७ मि.मी. इतका पाऊस रविवारी नोंदविला गेला. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अंबोली येथे २४, तर त्र्यंबक मध्ये दिवसभरात केवळ ५ मि.मी. इतक्या पावसाची नोंद होऊ शकली. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा जोर वाढला नसल्याने धरणाचा जलसाठा ७५२ दशलक्ष घनफूट इतका असून १३.३५ टक्क्यांपर्यंत पाण्याची पातळी घसरली आहे.शनिवारच्या तुलनेत रविवारी शहरात दिवसभर हलक्या, मध्यम सरींचा वर्षाव सुरू होता. शनिवारी दिवसभरात केवळ १.२ मि.मी. इतका पाऊस नोंदविला गेला होता. त्या तुलनेत रविवारी ३.९ मि.मी.पर्यंत पाऊस नोंदविला गेला. शहरात या हंगामात अद्याप केवळ १०७.६ मि.मी. इतका पाऊस पडला आहे.मृग नक्षत्राच्या अखेरीस पावसाचे आगमन झाले असले तरी पावसाने जोर धरला नसून आता आर्द्रा नक्षत्राची सर्वांना आशा लागली आहे. येत्या तीन जुलैपासून आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ होणार आहे. जुलै महिन्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्यास शहरावरील पाणीटंचाई व जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट दूर होण्यास मदत होईल.दिवसभर रिमझिम वर्षावरविवारी पहाटेपासून सकाळी ११ वाजेपर्यंत पावसाच्या दमदार सरी कोसळत होत्या. त्यानंतर पावसाने शहर व परिसरात उघडीप घेतली. दुपारपासून पुन्हा रिमझिम हलक्या सरींचा वर्षाव अधूनमधून सायंकाळपर्यंत सुरू च होता. यामुळे रविवार असूनही शहरातील बाजारपेठांमध्ये सायंकाळीही शुकशुकाट पहावयास मिळाला तर रेनकोट, छत्री खरेदीकडे नागरिकांचा कल वाढल्याचे चित्रही शहरातील तिबेटियन मार्केट, मेनरोड, कानडे मारुती लेन परिसरात नजरेस पडले.

टॅग्स :RainपाऊसDamधरण