शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 18:43 IST

अभोणा : धरणाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या कळवण तालुक्यात पावसाळयाचा निम्मा हंगाम संपत आला तरी सरासरीच्या अर्धाही पाऊस झाला नसून अद्याप नदी-नाले, सिंचन विहीरींनाही पाणी उतरलेले नाही. दुसरीकडे तालुक्यासह संपूर्ण कसमा पट्टा,खान्देशास पाण्यासाठी वरदान ठरणार्या चणकापूर व पुनंद प्रकल्पात अत्यल्प पाणी साठा आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

ठळक मुद्देपावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

अभोणा : धरणाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या कळवण तालुक्यात पावसाळयाचा निम्मा हंगाम संपत आला तरी सरासरीच्या अर्धाही पाऊस झाला नसून अद्याप नदी-नाले, सिंचन विहीरींनाही पाणी उतरलेले नाही. दुसरीकडे तालुक्यासह संपूर्ण कसमा पट्टा,खान्देशास पाण्यासाठी वरदान ठरणार्या चणकापूर व पुनंद प्रकल्पात अत्यल्प पाणी साठा आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.1973 सालात प्रथमच चणकापूर प्रकल्प कोरडाठाक झाला होता. तर पुनंद प्रकल्पात मृतसाठा होता. त्यामुळे बळीराजासह सर्वसामान्य हवालिदल झाले होते. मात्र 21 ते 31 जुलै 2019 दरम्यान कोसळधार झालेल्या पावसाने या प्रकल्पांमध्ये पाणी साठ्यात वाढ झाल्याने हजारो दलघफू पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या तालुक्यांसह 82 गावातील पाणीयोजनांना संजीवनी मिळाली होती. तर या पावसाने तालुक्यातील धनोली, भेगू, गोबापूर, माळेगाव, बोरदैवत, मार्कंडपिंपरी, धार्डेदिगर, खिराड, ओतूर, भांडणे, जामलेवणी, नांदूरी हे लघूप्रकल्प पूर्णक्षमतेने भरले होते. यंदा 2814 दलधफू क्षमतेच्या चणकापूर प्रकल्पात आजअखेर 590 दलधफू पाणी साठा असून 320 मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षी या काळात 365मिमी पाऊस, तर पाणीसाठा 1191 दलघफू होता. दरम्यान, गिरणा नदीपात्रातून 2500 क्युसेकने तर चणकापूर उजव्या कालव्यातून 60 क्युसेकने विसर्ग सुरु होता. तसेच 1404 दलघफू क्षमतेच्या पुनंद प्रकल्पात आजअखेर 422 दलघफू साठा असून गतवर्षी या काळात 653 दलघफू पाणीसाठा होता. त्यातूनही मोठ्याप्रमाणात विसर्ग सुरु होता. पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील लघु सिंचन प्रकल्प अद्याप कोरडेच आहेत. त्यामुळे बळीराजासह सर्वसामान्य वरूणराजाच्या कोसळण्याची आस बाळगून आहेत.

टॅग्स :water shortageपाणीकपातDamधरण