ँम्हाळसाकोरेच्या गारपीटग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा
By Admin | Updated: May 13, 2014 00:40 IST2014-05-12T17:45:17+5:302014-05-13T00:40:35+5:30
म्हाळसाकोरे- येथील गारपीटग्रस्तांना अद्यापही मदत न मिळाल्याने व बँकेला यादी देऊन निधी आला व परत गेला या चर्चेने आपत्तीग्रस्त विविध चर्चा करीत आहे. दरम्यान, या गारपिटीत ज्यांच्या घराचे नुकसान झाले ते पंचनाम्यात अंशत: असल्याने या घरांच्या नुकसानीची शासनाने फक्त १९०० रुपये किंमत ठरविली आहे. म्हाळसाकोरेत आठ इसमांना प्रत्येकी १९०० रकमेचे स्टेट बँकेचे धनादेश तलाठी मोतीराम पाटील यांनी वितरीत केले. परंतु जवळपास एक कोटीच्या पुढे द्राक्षबाग कांदा, गहू, मका इ. पिकांचे संपूर्ण पंचनामे करून रात्रीचा दिवस करून तलाठी पाटील यांनी मुदतीत अहवाल सादर केला; परंतु निधीची कमतरता की पळवापळवी यामुळे आपत्तीग्रस्त मात्र मदती वाचून अद्यापही वंचित आहे. खरिपाची आखणी, शेतमशागती, लग्न कार्यर्े अशा अडचणीत वा मदतीचे त्वरित वितरण करावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर)

----