मद्यविक्रीप्रकरणी मार्गदर्शनाची प्रतीक्षा

By Admin | Updated: March 15, 2017 22:42 IST2017-03-15T22:42:12+5:302017-03-15T22:42:38+5:30

एप्रिलपासून नूतनीकरण बंद : कारखान्यांची कचाट्यातून सुटका

Waiting for guidance on alcoholics | मद्यविक्रीप्रकरणी मार्गदर्शनाची प्रतीक्षा

मद्यविक्रीप्रकरणी मार्गदर्शनाची प्रतीक्षा

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील मद्यविक्रीच्या दुकानांबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यापूर्वी त्यातील काही बाबींबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले असून, त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल तथापि, जी दुकाने पाचशे मीटर अंतराच्या आत आहेत, त्यांचे परवाने १ एप्रिलपासून नूतनीकरण केले जाणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी दिली.
मंगळवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राज्य उत्पादन शुल्क विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील सर्व प्रकारच्या मद्यविक्रीच्या दुकानांचे अंतर मोजण्याचे काम सध्या सुरू असून, येत्या आठवडाभरात ते काम पूर्ण होईल.

Web Title: Waiting for guidance on alcoholics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.