शेतकरी कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: January 8, 2017 00:37 IST2017-01-08T00:37:38+5:302017-01-08T00:37:50+5:30

शेतकरी कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत

Waiting for farmers onion grants | शेतकरी कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत

शेतकरी कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत

 खामखेडा : मागच्या वर्षी राज्यासह नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने भाव मोठ्या प्रमाणावर घसरण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पिकासाठी केलेला खर्चही पडला नव्हता. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. तेव्हा चार-पाच महिन्यापासून शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रतिकिलो एक रुपये अनुदान देण्याचे ठरविले होते. तेव्हा अजूनही अनुदान न मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात घेतल्या गेलेल्या उन्हाळी कांद्याच्या उत्पादनामुळे भावात मोठी घसरण झाली. नफा तर सोडाच परंतु उत्पादन खर्चही शेतकऱ्यांना मिळणे कठीण झाले होते. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलास जरी मिळाला असला तरी यावर कांदा उत्पादक शेतकरी मात्र समाधानी नव्हता. तेव्हा शेतकऱ्याने धावपळ करून अनुदानासाठी बाजार ज्या बाजार समितीकडे कांदा विक्र ी केला होता. (वार्ताहर)

Web Title: Waiting for farmers onion grants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.