गोविंदनगर येथील मोकळा भूखंड विकासाच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: November 23, 2015 00:03 IST2015-11-23T00:01:57+5:302015-11-23T00:03:04+5:30
गोविंदनगर येथील मोकळा भूखंड विकासाच्या प्रतीक्षेत

गोविंदनगर येथील मोकळा भूखंड विकासाच्या प्रतीक्षेत
सिडको : प्रभाग क्रमांक ४१ येथील गोविंदनगर भागातील जॉगिंग ट्रॅकलगत असलेल्या कृष्णबन कॉलनी येथील मोकळ्या जागेत घाण, कचरा साचत असून यात सरपटणाऱ्या प्राण्यांचाही वावर वाढत चालला असून मोकळ्या जागेत उद्यान विकसित करण्याची मागणी येथील ज्येष्ठ नागरिक तसेच महिला मंडळाकडून करण्यात आली आहे.
गोविंदनगर भागातील जॉगिंंग ट्रॅकलगत मनपाच्या मालकीचा मोकळा भूखंड आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भूखंड विकसित करण्याची मागणी केली जात आहे. या मोकळ्या जागेत सध्या पालापाचोळा साचलेला असून घाण व कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले असून यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचाही वावर वाढला आहे. तसेच यामुळे डासांचे प्रमाणही वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर मोकळ्या जागेत मनपाने उद्यान विकसित करून झाडे लावण्याची मागणी येथील ज्येष्ठ नागरिक व महिला मंडळाने केली आहे. (वार्ताहर)