त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालय इमारतीच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा

By Admin | Updated: April 30, 2015 01:56 IST2015-04-30T01:56:14+5:302015-04-30T01:56:50+5:30

त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालय इमारतीच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा

Waiting for the completion of the Trimbakeshwar Rural Hospital building | त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालय इमारतीच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा

त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालय इमारतीच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा

  ! नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या अडीच महिन्यांवर येऊन ठेपला आहे़ सिंहस्थातील पर्वणीकाळात नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने सुमारे १४ कोटींचा आराखडा तयार केला आहे़ पूर्वीच्या त्र्यंबकच्या आराखड्यात बदल करून ३़११ कोटींऐवजी तो आता ४़३७ कोटींपर्यंत वाढविण्यात आला आहे़ या आराखड्यानुसार त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या शंभर बेडच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून, त्याचे पूर्णत्व व औषध साठ्यांबाबत साशंकता व्यक्त केली जाते आहे़ सिंहस्थ कुंभमेळा हा पावसाळ्यात असून, त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असते़ या पावसामुळे तसेच तेथील निर्माल्य, घाण यांची व्यवस्था लावण्याचे कोणतीही व्यवस्था नसल्याने याकाळात साथीचे रोगांची शक्यता आहे़ त्यातच पर्वणीकाळात लाखो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये येतील, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे़ भाविकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी सिंहस्थाच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरमधील तीस बेडचे रुग्णालय शंभर बेडचे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम सुरू आहे़ शंभर बेडच्या इमारतीचे हे बांधकाम संथ गतीने सुरू आहे़ या इमारतीमध्ये आॅपरेशन थिएटर, ओपीडी तसेच रुग्ण व स्टाफची व्यवस्था असणार आहे़ तसेच या इमारतीचे बांधकाम ८० टक्के पूर्ण झाल्याचा व मे महिन्याच्या अखेरपर्यंत इमारत पूर्ण करण्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे़ मात्र, सद्यस्थितीत या इमारतीच्या टाइल्स, खिडक्या अशी किमान डझनभर कामे बाकी आहेत.त्यामुळे बांधकामासाठी जूनअखेर उजाडेल अशी शक्यता आहे़

Web Title: Waiting for the completion of the Trimbakeshwar Rural Hospital building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.