शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

डोंगरगावकरांना मांजरपाड्याच्या पाण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 16:31 IST

येवला तालुका : उत्तरपूर्व भागात पोहोचलेल्या पाण्याने समाधान

ठळक मुद्देयेत्या पावसाळ्यात सदर पाणी हे डोंगरगाव पर्यंत नेऊन पोहोचविण्याचा शब्द राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : बहुप्रतिक्षीत अशा मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील बाळापूरपर्यंत येऊन ठेपले आहे तर येत्या पावसाळ्यात डोंगरगावपर्यंत पाणी जाऊन पोहोचणार असल्याने शेतकरी चातकाप्रमाणे पाण्याची प्रतीक्षा करत आहेत. सतत दुष्काळाचा शाप असलेल्या तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात पोहोचलेल्या मांजरपाडयाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.येवला व चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मांजरपाडा प्रकल्प वरदान ठरलेला आहे. यावर्षी मांजरपाड्याचे पाणी बाळापूर पर्यंत येऊन पोहोचल्याने तालुुक्याच्या उत्तरभागातील शेतक-यांच्या आशा उंचावल्या आहेत. येत्या पावसाळ्यात सदर पाणी हे डोंगरगाव पर्यंत नेऊन पोहोचविण्याचा शब्द राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन भुजबळ मंत्रिपदी विराजमान झाल्याने तालुक्यातील शेतक-यांच्या या प्रकल्पाबाबत आशा उंचावल्या आहेत. येवला तालुक्यातील कातरणी,विसापूर, विखरणी, आडगाव रेपाळ, मुरमी ,गुजरखेडे, बाळापूर, साबरवाडी खैरगव्हान तसेच चांदवड तालुक्यातील तळेगाव रोहीसह परीसरातील गावामध्ये ार्जन्यमान सरासरी पेक्षा कमी झाले आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला तर पेरणीयोग्य पाऊसही झालेला नव्हता त्यामुळे शेतकरीवर्गाचा जीव टांगणीला लागेलला असतानाच मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याने उभ्या असलेल्या पिकांना जीवदान मिळाले. कालव्याला पाणी प्रवाहित झाल्याने परीसरातील जमिनीची भूक भागल्याने विहिरींना पाणी उतरले. या पाण्याच्या भरवशावर शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा, मका, कपाशी, मेथी यासह इतर नगदी पिकाचे नियोजन केले.शेतक-यांमध्ये उत्साहाचे वातावरण गेल्या तीन ते चार वर्षांपासून या परिसरातील शेतकरी दुष्काळाने होरपळून निघाला होता मात्रया वर्षी विहिरींना पाणी चांगले असल्याने मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली. बेभरवशाचे असलेले कांदापीक या वर्षी मात्र शेतक-यांना लखपती करून गेले. कधी नव्हे तो कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतक-यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याशिवाय या परिसरात मोठ्या प्रमाणावर उन्हाळ कांद्याचीही लागवड सुरू असून उन्हाळ कांद्यालाही असाच भाव मिळेल अशी अपेक्षा आहे. शेतकºयांसोबतच मजूर वर्गही खुश असून मजुरीचे दरही वाढल्याने मजुरांच्या हातात चार पैसे जास्तीचे येऊ लागले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी