शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

बडदेनगर-पाटीलनगर भागातील रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 10:24 PM

सिडको : महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे डांबरीकरणाअभावी बडदेनगर-पाटीलनगर रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करावे, या मागणीसाठी नगरसेवकांनी सतत पाठपुरावा करून पाच कोटींहून अधिकचा निधी मंजूर करून घेतला. परंतु महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे रस्ता संपूर्ण धुळीत गेला आहे.

सिडको : महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे डांबरीकरणाअभावी बडदेनगर-पाटीलनगर रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करावे, या मागणीसाठी नगरसेवकांनी सतत पाठपुरावा करून पाच कोटींहून अधिकचा निधी मंजूर करून घेतला. परंतु महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे रस्ता संपूर्ण धुळीत गेला आहे. पावसाळ्याच्या आधी सदर रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.जुने सिडकोमधील बडदेनगर ते पाटीलनगर रस्ता डांबरीकरण करावा, या मागणीासाठी नगरसेवक राजेंद्र महाले, कल्पना पांडे, प्रवीण तिदमेंसह कल्पना चुंभळे यांनी पाठपुरावा करून महापालिकेकडून सुमारे पाच कोटी रु पयांचा निधी मंजूर करून घेतला. मात्र महापालिकेच्या दुर्लक्षामुळे सदरच्या रस्त्यावर केवळ खडीकरण करण्यात आलेले आहे. त्यावर मुरूम टाकून हा रस्ता तयार करण्यात आला असला आहे.डांबरीकरणाअभावी संपूर्ण रस्त्यावर धुळीचे लोट उठतात. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. सदरचा रस्ता पूर्ण झाल्यास सातपूर, अंबड या भागातील कामगारांना ये-जा करण्यासाठी तसेच नागरिकांना सोईचे होणार आहे. परंतु महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे व दुर्लक्षामुळे सदरचा रस्ता धुळीत गेला आहे, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.-------------------------४काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या अधिकारीनी व नगरसेवकांनी या रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी येथील भैरवनाथ मित्रमंडळाचे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिकांनी अधिकारी व नगरसेवकांची भेट घेऊन रस्ता त्वरित डांबरीकरण करावा, अशी मागणी केली आहे. सदर रस्त्याचे डांबरीकरण झाल्यास कामगारवर्गासह नागरिकांना सोईचे होणार आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक