वाहतूक पोलिसाच्या नेमणुकीची प्रतीक्षांवाहतूक पोलिसाच्या नेमणुकीची प्रतीक्षा
By Admin | Updated: August 10, 2014 02:19 IST2014-08-10T02:15:21+5:302014-08-10T02:19:40+5:30
वाहतूक पोलिसाच्या नेमणुकीची प्रतीक्षांवाहतूक पोलिसाच्या नेमणुकीची प्रतीक्षा

वाहतूक पोलिसाच्या नेमणुकीची प्रतीक्षांवाहतूक पोलिसाच्या नेमणुकीची प्रतीक्षा
पंचवटी : सेवाकुंज परिसरात असलेल्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी कसरत करावी लागत आहे. वर्दळ लक्षात घेऊन सेवाकुंज परिसरात शाळा सुटते व भरतेवेळी वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी करूनही वाहतूक शाखा दुर्लक्ष करीत असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नागरिकांनी याबाबतची मागणी केली असली, तरी त्याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या; मात्र वाहतूक पोलिसांच्या नेमणुकीची मागणी अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्याने वाहतूक शाखा केवळ वाहने अडविण्यापुरतीच आहे का, असा सवाल नागरिकांनी केला आहे. (वार्ताहर)