शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा वाढणार ; आता पूर्व प्राथमिक शिक्षणही ‘ऑनलाइन’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 19:02 IST

कोरोना संकटामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू होणे शक्य नसल्याने तिसरी ते बारावीपर्यंत ऑनलाइन शिक्षणाला परवानगी देण्यात आली होती. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी आणखी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याने शासनाने पूर्व प्राथमिक शाळांनीही ऑनलाइन शिक्षण देण्यास परवानगी दिली आहे.  त्यामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची आखणी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

ठळक मुद्देपूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षणशाळा सुरू होण्याची प्रतीक्षा वाढण्याची शक्यता

नाशिक  : राज्यातील कोरोना संकटामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू होणे शक्य नसल्याने तिसरी ते बारावीपर्यंत ऑनलाइन शिक्षणाला परवानगी देण्यात आली होती. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी आणखी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याने शासनाने पूर्व प्राथमिक शाळांनीही ऑनलाइन शिक्षण देण्यास परवानगी दिली आहे.  त्यामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची आखणी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

राज्यात १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. परंतु, अद्याप प्रत्यक्ष शाळा प्रत्यक्षात सुरू झालेल्या नाही. ऑनलाइन शाळा भरविल्या जात असल्या तरी सुरुवातीला शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या सूचनांमध्ये पूर्वप्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाने पूर्व प्राथमिक व प्राथमिकसह माध्यमिक व उच्च माध्यमिकसाठीही ऑनलाइन शिक्षणाचा कालावधी व स्कीन टाइम याविषयी नियमावली जाहीर करून पूर्व प्राथमिकपासून ऑनलाइन शिक्षणाला हिरवा कंदील दाखविला होता. त्यानंतर आता राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेही पूर्वीच्या निर्णयात बदल करून पूर्वप्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या ऑनलाइन वर्गांना परवानगी दिली आहे. त्यासाठी इयत्तानिहाय ऑनलाइन वर्गांचे कालावधीही शिक्षण विभागाने निश्चित करून दिले आहे. पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गाला ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या शाळांवर कारवाई करू नये, असे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षणाचे हे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. यापूर्वी लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर टप्प्या-टप्प्याने शाळा सुरू करण्यासंदर्भात अंदाजे तारखा शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या होत्या. परंतु, आता पूर्वप्राथमिकपासून ते थेट बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचे नियोजन होत असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची आखणी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थी