लिग्रॅण्ड कामगारांचा वेतनवाढीचा करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:12 IST2021-05-30T04:12:37+5:302021-05-30T04:12:37+5:30
या करारानुसार कामगारांना ११५५० रुपये वेतनवाढ, तसेच ७ रुपये दराने महागाई भत्ता ही मिळणार आहे. दर वर्षी २० टक्के ...

लिग्रॅण्ड कामगारांचा वेतनवाढीचा करार
या करारानुसार कामगारांना ११५५० रुपये वेतनवाढ, तसेच ७ रुपये दराने महागाई भत्ता ही मिळणार आहे. दर वर्षी २० टक्के बोनस (सुमारे ७६ हजार रुपये) पूर्ण बेसिक डीएवर दिला जाईल. याव्यतिरिक्त सेवानिवृत्त झालेल्या कामगारांचाही विचार युनियन आणि व्यवस्थापनाने केला आहे. कामगार कुटुंबास वयाच्या ७५ वर्षांपर्यंत मेडिक्लेमची सुविधा चालू राहणार आहे. त्याचा हप्ता कंपनी भरणार आहे. याव्यतिरिक्त सेवानिवृत्त होणाऱ्या कामगारांना दुप्पट ग्रॅच्युईटी देण्याचेही निश्चित करण्यात आले आहे. सध्याच्या कायद्यानुसार सेवानिवृत्त कामगारांना एक वर्षाच्या सेवेसाठी पंधरा दिवसांचा बेसिक डीए याप्रमाणे ग्रॅच्युइटी दिली जाते. परंतु या करारानुसार कामगारांना एक वर्षाच्या सेवेसाठी ३० दिवसांचे बेसिक डीए दराने ग्रॅच्युईटी मिळणार आहे. या करारावर सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे, तुकाराम सोनजे, सोपान पवार, खुशाल चौधरी,संजीव अहिरराव, बेनीलाल पवार, किशोर रोकडे तर व्यवस्थापनाच्या वतीने सहायक उपाध्यक्ष नितीन महाजन, महाव्यवस्थापक अभय खरे, नितीन शिंदे आदींनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी युनियनचे सेक्रेटरी अरविंद शाहपुरे, आत्माराम डावरे उपस्थित होते.