कोका कोला कंपनीत वेतनवृद्धी करार
By Admin | Updated: December 22, 2015 22:45 IST2015-12-22T22:35:38+5:302015-12-22T22:45:13+5:30
कोका कोला कंपनीत वेतनवृद्धी करार

कोका कोला कंपनीत वेतनवृद्धी करार
सातपूर : अंबड येथील हिंदुस्थान कोका कोला कंपनीतील कामगारांना दरमहा ८०४० रुपयांची वेतन वाढ मिळवून देणारा यशस्वी वेतन वाढीचा करार करण्यात आल्याने कामगारांचे वेतन आता ३० ते ३३ हजारांपर्यंत होणार असल्याची माहिती सीटूचे सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड यांनी दिली.
हिंदुस्थान कोका कोला कंपनी व्यवस्थापन आणि सीटू संलग्न नाशिक वर्कर्स युनियन यांच्यात झालेल्या वेतनवाढीच्या करारानुसार कामगारांना दरमहा ८०४० रुपये मिळणार आहेत. यामध्ये ५०४० रु पये मूळ वेतनात तसेच विविध भत्त्यात ३०० रुपयांची वाढ मिळणार आहे.
बदलत्या महागाई भत्त्यामुळे ३५०० वाढ मिळणार आहे. याव्यतिरिक्त दरवर्षी २४,३०० रु पये बोनस मिळणार आहे. तर ३०० रु पये दिवाळी भेट, कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी २ लाखांचा मेडिक्लेम विमा, गंभीर आजारासाठी ५ लाखांचा व अपघातासाठी ५ लाखांचा विमा संरक्षण लागू करण्यात आला आहे. सहल भत्ता म्हणून दरवर्षी ४५०० रु पये मिळणार आहेत.
या करारावर कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने केदार सप्रे, एस. आर. देशमुख, ब्रिजेश जाधव, सीटूच्या वतीने सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड, अध्यक्ष आर. एस. पांडे, उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे, तुकाराम सोनजे, सदस्य मुस्ताक शेख, एस. जी. पवार, एच. बी. साळुंखे, विष्णू शिरसाठ, डी. एस. देशमुख आदिंनी स्वाक्षऱ्या केल्या. (वार्ताहर)