वॉटर कप स्पर्धेत वडझिरेने पटकावले १० लाखांचे प्रथम पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 18:47 IST2019-08-11T18:46:32+5:302019-08-11T18:47:13+5:30
वडझिरे : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये सिन्नर तालुक्यातून वडझिरे गावाने तालुक्यातून प्रथम क्र मांकाचे दहा लाख रु पयांचे पारितोषिक पटकावले आहे. तर पाटोळे व हिवरे ही गावे अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्र मांकांचे मानकरी ठरले आहेत.

वॉटर कप स्पर्धेत वडझिरेने पटकावले १० लाखांचे प्रथम पारितोषिक
पुणे येथे झालेल्या पाणी फाउंडेशनच्या बक्षीस वितरण समारंभात तालुक्यातील वडझिरे गाव सरस ठरले. पाणी फाउंडेशनचे प्रमुख आमिर खान, किरण राव, सत्यजित भटकळ, अविनाश पोळ, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, सहकलाकार अनिता दाते, अजय अतुल, सोनाली कुलकर्णी आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वडझिरे गावाला सन्मानित करण्यात आले. यावेळी गावचे सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बोडके, सरपंच शोभा बोडके, ग्रामसेवक पांडुरंग सोळुंके, उपसरपंच छाया नागरे, अलका बोडके, रेखा बोडके, रोहिणी बोडके, विश्वनाथ बोडके, सोमनाथ बोडके, संजय बोडके, गंगा बोडके, सोपान बोडके, अशोक बोडके, बाजीराव बोडके, आप्पा दराडे, देविदास कुटे, प्रकाश सांगळे, संदीप आंबेकर, राहुल चव्हाण, सुनिल नागरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.