वडझिरे रस्त्याची श्रमदानातून दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:19 IST2021-04-30T04:19:09+5:302021-04-30T04:19:09+5:30

तालुक्यातील वडझिरे गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची गेल्या वर्षापासून दुरवस्था झाली होती. जागोजागी रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. ...

Wadzire road repairs through labor | वडझिरे रस्त्याची श्रमदानातून दुरुस्ती

वडझिरे रस्त्याची श्रमदानातून दुरुस्ती

तालुक्यातील वडझिरे गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची गेल्या वर्षापासून दुरवस्था झाली होती. जागोजागी रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. वडझिरेचे नवनिर्वाचित उपसरपंच मनोहर बोडके यांनी पुढाकार घेऊन रस्त्याची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाकाळात गावातून कोविड रुग्ण बाहेरील दवाखान्यात नेताना रस्त्याची मोठी अडचण निर्माण होत होती. सिन्नरमार्गे माळेगाव औद्योगिक वसाहतीतून वडझिरे व ब्राह्मणवाडे गावाला जाण्यासाठी हाच एकमेव पर्याय रस्ता आहे. अवजड वाहनांमुळे सुमारे सात ते आठ किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. उपसरपंच बोडके यांच्यासह काही उद्योजक व ग्रामपंचायत सदस्य भीमराव दराडे, भास्कर ठोंबरे, बाळू बोडके, रामेश्वर बोडके, बाळकृष्ण बोडके, सुकदेव बोडके, शिवाजी बोडके यांनी स्वखर्चाने तसेच श्रमदानातून पोकलॅन मशीन व डंपर उपलब्ध करून दिल्याने रस्त्याची डागडुजी करण्यात आली.

फोटो - २९ वडझिरे रोड

सिन्नर तालुक्यातील वडझिरे रस्त्याची श्रमदानातून करण्यात आलेली डागडुजी.

===Photopath===

290421\29nsk_29_29042021_13.jpg

===Caption===

 फोटो - २९ वडझिरे रोड सिन्नर तालुक्यातील वडझिरे रस्त्याची श्रमदानातून करण्यात आलेली डागडुजी. 

Web Title: Wadzire road repairs through labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.