वाडकर न्यायालयात हजर

By Admin | Updated: July 17, 2014 22:02 IST2014-07-17T00:16:06+5:302014-07-17T22:02:23+5:30

वाडकर न्यायालयात हजर

Wadkar attends court | वाडकर न्यायालयात हजर

वाडकर न्यायालयात हजर

नाशिक : जमीन फ सवणूक प्रकरणी गुन्हा दाखल असलेले सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी आज नाशिकच्या जिल्हा न्यायालयात हजेरी लावली़ सुनावणीच्या वेळी वाडकर यांनी न्यायालयात हजर रहावे असा अर्ज सरकारी वकिलांनी न्यायालयात केला होता़ हा अर्ज न्यायालयाने मंजूर केल्यामुळे वाडकर यांनी हजेरी लावली़ दरम्यान, या अंतरिम जामीन अर्जावर १८ जुलैला अंतिम निर्णय होणार आहे़
देवळाली कॅम्प परिसरातील जमीन फसवणूक प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी वाडकर यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अंतरिम जामीन अर्ज दाखल केलेला आहे़
भागीदारीत घेतलेल्या या जमिनीचे मूळ मालक विनायक धोपावकर व विजया करंदीकर या दोघांना हाताशी धरून ७ फेब्रुवारी २०१३ रोजी वादात सापडलेली मिळकत सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी स्वत:च्या नावे लिहून घेऊन फ सवूणक केल्याची फि र्याद हेमंत कोठीकर यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Wadkar attends court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.