वाडीवºहेत आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 23:12 IST2020-07-04T22:49:00+5:302020-07-04T23:12:08+5:30
इगतपुरी : कोरोनाकाळात जिवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देणाºया डॉक्टर, पोलीस, आरोग्यसेविका, अंगणवाडीसेविका, सामाजिक कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सेवा देत असलेल्या ठिकाणी जाऊन सन्मानित करण्यात आले.

वाडीवºहेत आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार
वाडीवºहे प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देणाऱ्या आरोग्यसेविका वर्षा पवार यांचा सन्मान करताना मुक्ताबाई गोवर्धने, मनाली गवते आदी.
इगतपुरी : कोरोनाकाळात जिवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देणाºया डॉक्टर, पोलीस, आरोग्यसेविका, अंगणवाडीसेविका, सामाजिक कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सेवा देत असलेल्या ठिकाणी जाऊन सन्मानित करण्यात आले.राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी तालुकाध्यक्ष मुक्ताबाई गोवर्धने, कार्याध्यक्ष मनाली गवते यांनी प्रशासकीय सेवेत महत्त्वपूर्ण सेवा देणाºया रणरागिनींचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात वाडीवºहे पोलीस ठाण्यातील महिला पोलीस नीलम गाडे, आरोग्यसेविका वर्षा पवार, अंगणवाडीसेविका सुनीता गांगड, आशासेविका कुसुम सूर्यवंशी, मथुरा जाधव आदींना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले आहे.