वडाळीभोई अपघातातील जखमीचा मृत्यू
By Admin | Updated: April 29, 2016 22:56 IST2016-04-29T22:55:07+5:302016-04-29T22:56:24+5:30
वडाळीभोई अपघातातील जखमीचा मृत्यू

वडाळीभोई अपघातातील जखमीचा मृत्यू
सोग्रस : चांदवड तालुक्यातील वडाळीभोई येथे महामार्गावर पंधरा दिवसांपूर्वी मोटारसायकल व महिंद्र कार यांच्यात झालेल्या अपघातातील जखमी विजय अण्णा सादडे (३६), रा. शिंदे, ता. चांदवड यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान काल सकाळी १० वाजता मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. वडनेरभैरवचे सहायक पोलीस निरीक्षक चंदन इमले हे तपास करीत आहेत.
केद्राई धरणात बुडून एकाचा मृत्यू
सोग्रस : चांदवड तालुक्यातील खडकओझर येथील केद्राई धरणात बुडून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अर्जुन सुखदेव देवरे (२४), रा. वडाळीभोई, ता. चांदवड हा तरुण रात्रीच्या सुमारास केद्राई धरणात पडून बुडून मरण पावला. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. वडनेरभैरव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक चंदन इमले अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर )
युवकास लुटले
नाशिक : साईनाथनगर चौफुलीवर एका युवकास दोन दुचाकींवरून आलेल्या चौघा हल्लेखोरांनी चाकूने वार करत लुटल्याची घटना बुधवारी (दि. २७) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले आहे. साईनाथनगर येथील सनशॉवर सोसायटीत राहणारे ललित चेतन कटारिया (२२) हे घरी इंदिरानगरकडून पायी जात होते. सिग्नलच्या पुढे दुचाकींवरून आलेल्या अज्ञात लुटारूं नी त्यांना अडविले व भ्रमणध्वनी हिसकावून घेत चाकूने कटारिया यांच्या पोटावर वार केल्याचे फिर्यादीत म्हटले
आहे.
या हल्ल्यात कटारिया गंभीर जखमी झाले. वीस हजार रुपये किमतीचा भ्रमणध्वनी हिसकावून हल्ला केल्याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक केतन राठोड
करीत आहेत. (प्रतिनिधी)