शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वडाळागावातील गोठे डिसेंबरअखेर हटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:11 IST

वडाळागावातील जनावरांचे गोठे हटविण्यास महापालिकेने डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली असल्याने नूतन वर्षात वडाळागाव जनावरांच्या गोठ्याविना मोकळा श्वास घेणार असल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.

इंदिरानगर : वडाळागावातील जनावरांचे गोठे हटविण्यास महापालिकेने डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली असल्याने नूतन वर्षात वडाळागाव जनावरांच्या गोठ्याविना मोकळा श्वास घेणार असल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.  वडाळागावातील जनावरांच्या गोठ्यातील मलमूत्र उघड्यावर व रस्त्यावर सोडण्यात आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळे गावात माणसे राहतात की जनावरे असा प्रश्न नागरिक करीत होते. त्याची दखल घेत अखेर प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सदरचे गोठे हलविण्यासाठी गोठे मालकांना डिसेंबरपर्यंत डेडलाईन दिली आहे.  वडाळागावात सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी संपूर्ण शेती होती. शेती व हातावर काम करणारी वस्ती म्हणून वडाळागावाची ओळख होती. त्यानंतर मात्र जमिनीला भाव मिळू लागल्याने शेती विकून याठिकाणी वसाहत निर्माण झाली. सुमारे २० वर्षांपूर्वी गावात एक ते दोन जनावरांचे गोठे होते. परंतु आज त्यांची संख्या सुमारे पंचवीस ते तीसच्या घरात गेली आहे. प्रत्येक जनावरांच्या गोठ्यात सुमारे सहाशे ते सातशे जनावरे आहेत. या सर्व गोठ्यांच्या मलमूत्राचा प्रश्न निर्माण होत असल्याने सर्वच गोठेधारकांकडून गोठ्याच्या बाहेर खड्ड्यात किंवा नाल्यात मलमूत्र सोडून दिले जात आहे. तसेच काही गोठेधारकांनी खत म्हणून मलमूत्र विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात साठवून ठेवले आहे.दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यातरस्त्यावर मलमूत्राची घाण व दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना नेहमीच साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत होते. परंतु आता नूतन वर्षाच्या आत गावातील जनावरांचे गोठे हटवण्यात येणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcowगायNashikनाशिक