शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

नाशिकमधील वडाळा झोपडपट्टी हटवली, आता श्रमिकनगर झोपडपट्टीकडे वळवणार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 18:17 IST

झोपडपट्टीवर लवकरच कारवाई : महापालिका करणार बळाचा वापर

ठळक मुद्देश्रमिकनगरमध्येही सुमारे तीनशे लाभार्थ्यांना वडाळा येथील घरकुल योजनेत लाभ देण्याचे निश्चित रहिवाशांकडून सोडतीला प्रतिसादच दिला जात नसल्याने स्थलांतराचा प्रश्न भिजत

नाशिक - महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पंधरा वर्षांपासून वसलेल्या वडाळागावातील झोपडपट्टीवर जेसीबी चालविल्यानंतर आता गंजमाळवरील श्रमिकनगरकडे मोर्चा नेण्याची तयारी सुरु केली आहे. श्रमिकनगरमध्येही सुमारे तीनशे लाभार्थ्यांना वडाळा येथील घरकुल योजनेत लाभ देण्याचे निश्चित होऊनही संबंधित लाभार्थी झोपडी सोडायला तयार नाहीत. त्यामुळे महापालिकेने आता बळाचा वापर करण्याच्यादृष्टीने हालचाली चालविल्या आहेत.सुमारे १५ वर्षांपूर्वी वडाळानाका परिसरातील झोपडपट्टी महापालिकेने वडाळागाव परिसरात स्थलांतरीत केली होती. त्यानंतर, सावित्रीबाई फुलेनगर असे नामकरण झालेल्या या झोपडपट्टीतील सुमारे ३५० लाभार्थ्यांना जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान अभियानांतर्गत वडाळागाव येथे साकारलेल्या ७२० घरकुलांच्या योजनेत लाभ देण्यात आला होता. परंतु, लाभ देऊनही संबंधितांनी आपले झोपडी सोडली नव्हती, त्यामुळे महापालिकेने वडाळागाव झोपडपट्टी जमिनदोस्त करण्याची कारवाई पार पाडली. या कारवाईमुळे महापालिकेची जागा मोकळी होण्याबरोबरच शंभर फुटी रस्त्यावरील अडथळाही दूर झालेला आहे. वडाळागाव येथे राबविलेल्या मोहिमेनंतर आता महापालिकेने गंजमाळवरील श्रमिकनगर झोपडपट्टीकडे आपला मोर्चा नेण्याची तयारी चालविली आहे. श्रमिकनगर येथील सुमारे ३०० लाभार्थ्यांना वडाळागाव येथील घरकुल योजनेत लाभ देण्याचे निश्चित झाले आहे. परंतु, संबंधित रहिवाशांकडून सोडतीला प्रतिसादच दिला जात नसल्याने स्थलांतराचा प्रश्न भिजत पडला आहे. महापालिकेने मात्र, आता वडाळागावची झोपडपट्टी हटविल्यानंतर श्रमिकनगरचाही प्रश्न निकाली काढण्याची तयारी केली असून लवकरच वडाळाप्रमाणेच श्रमिकनगरवरही जेसीबी चालविला जाणार आहे. वेळ पडल्यास बळाचा वापर करण्याचीही तयारी महापालिकेने केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका