व्यंकट रमणाच्या गजरात अवभृतस्नान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 01:06 IST2017-10-02T01:06:14+5:302017-10-02T01:06:24+5:30

व्यंकट रमणाच्या गजरात अवभृतस्नान
नाशिक : ब्रह्मोत्सवांतर्गत गंगापूर धबधब्याजवळील शंकराचार्य न्यास व्यंकटेश बालाजी मंदिर येथे आश्विन शुध्द एकादशीच्या पार्श्वभूमीवर अवभृतस्नान विधीचे आयोजन करण्यात आले होते. व्यंकटेश बालाजी मंदिरातून ‘गोविंदा व्यंकट रमणा गोविंदा’ असा जयघोष करत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंदिरातील बालाजी, भूदेवी, श्रीदेवी यांच्यासह पंचधातू उत्सव मूर्तींना गोदातीरी अवभृतस्नान घालण्यात आले. मंगलमय वातावरणात मूर्तींची पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मुकुंद खोचे यांनी या सोहळ्याचे पौरोहित्य केले तसेच शंकराचार्य न्यासाचे विश्वस्त अवधूत देशपांडे, व्यवस्थापक राजेंद्र जोशी यांच्या हस्ते ही पूजा संपन्न झाली.