उमराणे ग्रामपंचायतीसाठी आज मतदान; लगेच मतमोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:45 IST2021-03-11T21:41:55+5:302021-03-12T00:45:15+5:30
उमराणे : बहुचर्चित उमराणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. १२) मतदान होणार असून, निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव देवळा पोलीस प्रशासनाकडून गुरुवारी (दि.११) संपूर्ण गावातून सशस्र संचालन करण्यात आले.

उमराणे ग्रामपंचायतीसाठी आज मतदान; लगेच मतमोजणी
उमराणे : बहुचर्चित उमराणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. १२) मतदान होणार असून, निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव देवळा पोलीस प्रशासनाकडून गुरुवारी (दि.११) संपूर्ण गावातून सशस्र संचालन करण्यात आले.
विविध कारणास्तव चर्चेत असलेल्या उमराणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होत असल्याने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व छत्रपती हायस्कूलमध्ये सहा प्रभागांसाठी एकूण बारा मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.जी. पाटील यांनी दिली. मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी मतदान कर्मचारी हजर झाले आहेत. दरम्यान, मतदान सुरक्षित व शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक महेश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गावातून सशस्र संचालन करण्यात आले. उमराणे बिटचे सहा. पोलीस उपनिरीक्षक ए.बी. फसाले, पोलीस हवालदार एम.बी. बच्छाव, वार.एन. क्षीरसागर, के.आर.पवार, डी.एल. गायकवाड संचालनात सहभागी झाले होते.
कातरणीसाठीही सज्जता
उमराणेप्रमाणेच येवला तालुक्यातील कातरणी ग्रामपंचायतीचीही निवडणूक सरपंच व सदस्यपदाच्या लिलावावरून रद्द करण्यात आली होती. आता उमराणेबरोबरच कातरणीसाठीही मतदान होत असून, ११ जागांमधील पाच जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत, तर उर्वरित ६ जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.