शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान; साहित्य घेऊन अधिकारी कर्मचारी केंद्रावर रवाना

By संकेत शुक्ला | Updated: June 25, 2024 17:55 IST

जिल्ह्यातील २९ केंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी सहा यावेळेत मतदान होणार आहे.

नाशिक : शिक्षक विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या (दि.२६) मतदान होत असून कर्मचारी साहित्य घेऊन मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत. नाशिक विभागात २१ उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये मुख्य लढत विद्यमान आमदार शिंदे सेनेचे उमेदवार किशोर दराडे, उद्धव सेनेचे संदीप गुळवे, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि अजित पवार गटाचे महेंद्र भावसार या चौघांमध्ये लढत होणार आहे. जिल्ह्यातील २९ केंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी सहा यावेळेत मतदान होणार आहे.

नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांमधील एकूण ६९ हजार ३६८ शिक्षक मतदान करू शकणार आहेत. बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार असून उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रमांक नोंदवून शिक्षकांना मतदान करता येणार आहे. मतदानासाठीचे बॅलेट पेपर, पाच टक्के अतिरिक्त बॅलेट पेपर, पेन, शाई यांसारखी आवश्यक सामग्री घेऊन कर्मचारी मंगळवारी सकाळी मतदान केंद्रांकडे रवाना झाले. मतदारसंघात सर्वाधिक २५ हजार ३०२ मतदार नाशिकमध्ये आहेत. जिल्ह्यातील २९ केंद्रांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. शहरातील दहा मतदान केंद्रांसह सटाणा, येवला, निफाडसह मालेगाव ग्रामीणमध्ये प्रत्येकी दोन तर देवळा, नांदगाव, चांदवड, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर इगतपुरी, सिन्नरसह मालेगाव शहरात प्रत्येकी एक केंद्र आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सहा कर्मचाऱ्यांची नियुक्त केली आहे. यामध्ये एक केंद्राध्यक्ष, तीन कर्मचारी, एक सूक्ष्म निरीक्षकासह शिपायाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १७४ कर्मचाऱ्यांची मतदान प्रक्रियेसाठी नियुक्ती केली असून याशिवाय प्रत्येक केंद्रावर दोन पोलिस कर्मचारी बंदोबस्ताला असणार आहेत.

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे