शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

शिक्षक मतदारसंघ मतदान; आज शाळांना सुटी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:23 AM

महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२५) मतदान होत असून, यानिमित्ताने मतदारसंघातील शाळांना सुटी देण्यात आलेली नसल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम माने यांनी रविवारी (दि.२४) सायंकाळी पाच वाजता विभागीय आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

नाशिकरोड : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२५) मतदान होत असून, यानिमित्ताने मतदारसंघातील शाळांना सुटी देण्यात आलेली नसल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम माने यांनी रविवारी (दि.२४) सायंकाळी पाच वाजता विभागीय आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. मतदारांना विशेष नैमित्तिक रजा घेण्याची किंवा उशिरा कामावर हजर होण्याचा यापैकी एक पर्याय वापरता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची सोमवारी (दि.२५) निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तयारीसंदर्भात माहिती देण्यासाठी राजाराम माने यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपायुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, तहसीलदार सुनंदा मोहिते आदी उपस्थित होते. सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान मतदान प्रक्रि या पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात असून ५३ हजार ३३५ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विभागातील एकूण ९४ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, एक मायक्र ो आॅब्झर्वर, एक शिपाई अशा सहा कर्मचाऱ्यांसह संपूर्ण विभागात ५६४ कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.  याशिवाय आवश्यकतेनुसार क्षेत्रिय अधिकाºयांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे. राखीव कर्मचाºयांसह ७०७ कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. आज सायंकाळी मतदानप्रक्रि या पूर्ण झाल्यानंतर सर्व पाचही जिल्ह्यांतील मतपेट्या सोमवारीच मतमोजणीच्या ठिकाणी सेंट्रल वेअर हाऊसिंग कार्पोरेशन, अंबड, नाशिक येथे सुरक्षा कक्षात जमा केल्या जाणार आहेत.मोबाइलला परवानगी नाही  मतदान केंद्रावर मतदारांसह उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना मोबाइलसह इतर कोणत्याही स्वरूपाचे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदानाच्या गोपनीयतेचा भंग करणाºयांविरोधात कडक कारवाई करण्याचे अधिकार संबंधित मतदान केंद्र अधिकाºयांना देण्यात आलेले आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक