मतदान करणे म्हणजे देशसेवाच
By Admin | Updated: February 21, 2017 01:02 IST2017-02-21T01:01:54+5:302017-02-21T01:02:05+5:30
मत नोंदवा : सोशल मीडियावरून साद

मतदान करणे म्हणजे देशसेवाच
नाशिक : लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळण्यास, विकासाला गती येण्यास भरीव मदत होते. याच दृष्टिकोनातून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावण्याची गरज असून, प्रत्येकाने मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन तरुणाईने सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.
प्रत्येक मतदाराने लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी केलेले मतदान म्हणजे देशसेवाच असल्याच्या प्रतिक्रिया तरुण वर्गातून सोशल मीडियातून व्यक्त होत आहे. एक मतदान नाही केलं तर काय फरक पडतो! मतदानानिमित्त सुट्टी आहे म्हणून आनंद उपभोगुया, कुठेतरी सहल काढुया! हे विचार म्हणजे नाकर्तेपणाचे लक्षण आहे. अशाप्रकारचे वर्तन म्हणजे एखाद्या धोक्याची जाणीव असतानाही दुर्लक्ष करणे आहे. त्यामुळे भविष्यातील धोके टाळण्यासाठी चांगले उमेदवार निवडूण देणे गरजेचे आहे. ही संधी गमावू नका अशा प्रकारेचे आवाहन तरुण मित्र-मैत्रिणींना संदेशांद्वारे करीत असून, विविध ग्राफिक्स, टेक्स्ट मेसेज, व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून मतदार जागृती करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)