अझहर शेख।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुस्लीम समाजाच्या दृष्टीने अनन्यसाधारण असे धार्मिक महत्त्व प्राप्त असलेल्या पवित्र रमजान पर्वाला ६ मेपासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिला टप्प्याचे मतदान ११ एप्रिल, तर अखेरच्या चौथ्या टप्प्याचे मतदान २९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. त्यामुळे राज्यात कुठल्याहीप्रकारे रमजान काळात निवडणुकीचे वातावरण पहावयास मिळणार नाही.रमजान पर्वमध्ये मुस्लीम बांधवांची दिनचर्या बदललेली पहावयास मिळते. १५ ते १६ तासांचे निर्जळी उपवास (रोजा) या काळात महिनाभर केले जातात. तसेच पाचवेळेच्या नमाजपठणासह रात्री उशिरापर्यंत ‘तरावीह’ची विशेष नमाज मुस्लीम बांधव रमजानकाळत पठण करतात. या महिन्यात उपासनेवर अधिकाधिक भर दिला जातो; मात्र मतदानप्रक्रियेत त्याचा कुठलाही अडसर निर्माण होत नाही. कारण देशभरात मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असते. त्यामुळे या वेळेत जवळच्या मतदान केंद्रांवर जाऊन लोकशाहीचा अधिकार मुस्लीम नागरिकदेखील सहजरीत्या बजावू शकतात, असे नाशिक शहरातील धर्मगुरूंनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. रमजान पर्व काळात देशातील काही राज्यांत मतदान होणार असले तरीदेखील त्याचा कुठलाही नकारात्मक प्रभाव मतदान किंवा निवडणूक प्रक्रियेवर होणार नाही, तर मुस्लीम मतदानाचा टक्का वाढलेला दिसून येईल, असे मत स्थानिक धर्मगुरू व उलेमांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे.
राज्यात रमजानपूर्व संपणार मतदान प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 01:38 IST
मुस्लीम समाजाच्या दृष्टीने अनन्यसाधारण असे धार्मिक महत्त्व प्राप्त असलेल्या पवित्र रमजान पर्वाला ६ मेपासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिला टप्प्याचे मतदान ११ एप्रिल, तर अखेरच्या चौथ्या टप्प्याचे मतदान २९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. त्यामुळे राज्यात कुठल्याहीप्रकारे रमजान काळात निवडणुकीचे वातावरण पहावयास मिळणार नाही.
राज्यात रमजानपूर्व संपणार मतदान प्रक्रिया
ठळक मुद्दे६ मेपासून प्रारंभ शक्यनिवडणुकीवर ‘रमजान’चा सकारात्मक प्रभाव; धर्मगुरूंचे मत