बाजार समितीसाठी आज मतदान
By Admin | Updated: April 23, 2016 23:57 IST2016-04-23T23:57:26+5:302016-04-23T23:57:39+5:30
लासलगाव : शेतकरी विकास व आपलं पॅनलमध्ये दुरंगी लढत

बाजार समितीसाठी आज मतदान
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रविवारी (दि. २४) होत आहे. शेतकरी विकास आणि आपलं बळीराजा पॅनलमध्ये दुरंगी; परंतु अत्यंत चुरशीची लढत होणार असून, निकाल सोमवारी (दि. २५) जाहीर होणार आहे.
बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर व पंढरीनाथ थोरे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलमध्ये आणि तसेच बाजार समितीचे विद्यमान सभापती नानासाहेब पाटील, भाजपा नेते सुरेश बाबा पाटील व कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या नेतृत्वाखालील आपलं बळीराजा पॅनलमध्ये अटीतटीची लढत होत आहे. या निवडणुकीकरिता लासलगाव, नांदूरमधमेश्वर, विंचूर, निफाड व देवगाव येथील पाच मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, मतदान व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे हे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार संदीप अहेर हे काम पहात असून, त्यांना विलास वैद्य हे सहाय्यक म्हणून काम करत आहेत. (वार्ताहर)